सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही, असे सर्व आश्चर्यकारक व्हिडीओ येथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. कधी वन्य प्राण्यांचे व्हिडीओ लोकांना आश्चर्यचकित करतात, तर कधी समुद्री प्राण्यांचे व्हिडीओ आपले लक्ष वेधून घेतात. पण, सोशल मीडियावर समुद्री प्राण्याचा एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. एक तरुणी समुद्राच्या किनाऱ्यावर बसून फोटो काढण्याचा आनंद घेत होती. यावेळी या तरुणीबरोबर असे काही घडले की पाहून तुम्हीही शॉक व्हाल. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर समुद्रकिनारी फिरताना काळजी घ्या, असे आवाहन केले आहे.

कारण समुद्रातील प्राणी तुमची मजा कधीही अपघातात बदलवू शकतात. असाच एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये समुद्रातील शांत प्राण्यांपैकी एक असलेल्या सी लॉयनने एका तरुणीला चक्क पाण्यात ओढले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी समुद्रकिनारी बसून फोटो काढण्याचा आनंद घेत होती. तेवढ्यात मागून एक प्राणी येतो आणि तो तरुणीला अतिशय वाईटप्रकारे पाण्यात ओढत घेऊन जातो. हा सागरी प्राणी म्हणजे सी लॉयन. यानंतर तरुणीचे आजोबा लगेच समुद्रात उडी मारून तिचा जीव वाचवतात.

हा व्हिडीओ @discover.our.nature नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात सी लॉयनच्या वागणुकीशी संबंधित माहितीही शेअर केली आहे.

हा काय प्रकार? ‘वंदे भारत’ची अवस्था पॅसेंजर ट्रेनपेक्षाही वाईट; VIDEO पाहून युजर म्हणाला, “देशात श्रीमंतांसाठी…”

या माहितीनुसार, हा सी लॉयन ह्यूमन फ्रेंडली सी क्रीचर प्राणी आहे, जे खडकाळ किनाऱ्यावर किंवा मानवनिर्मित किनाऱ्यावरही राहतात. ते सहसा इतके आक्रमक नसतात. असे सांगण्यात येते की, प्रजनन काळात नर सी लॉयन त्यांच्या प्रदेशाबाबत थोडे सावध असतात आणि ते आक्रमकही होऊ शकतात. अशा वेळी त्यांच्या जवळ माणूस किंवा इतर कोणी गेले तर ते त्याला धोका मानून हल्ला करू शकतात. जेव्हाही तुम्ही अशा प्राण्यांना पाहायला जाल तेव्हा त्यांच्यापासून विशिष्ट अंतर राखा; विशेषत: त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आणि तुम्ही प्राणीसंग्रहालयात किंवा इतर कुठेही गेलात तर तिथे दिलेल्या सूचनांचे पालन करा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.