Viral video: सोशल मीडिया हे माहितीचं भंडार आहे. इथे अशा काही गोष्टी पाहायला किंवा ऐकायला मिळतात की कधीकधी त्यामुळे धक्काच बसतो. तर कधीकधी इथे मीम मटेरीयल देखील व्हायरल होतं, ज्याला कधी लोक डोक्यावर घेतात तर कधी ट्रोल करतात. सध्या मुलांच्या लग्नाचा विषय फारच गंभीर होत चाललाय. हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःचं घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. नणंद, दीर नको, सासू-सासऱ्यांपासून नवरा वेगळा हवा, त्याचा पुण्या-मुंबईत फ्लॅट हवा, अशा अपेक्षा सध्या मुलींसह पालकांकडून व्यक्त होत आहेत. ‘असलाच नवरा पाहिजे हं…’ अशा मानसिकतेच्या मुलींमुळे अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान अशाच लग्न ठरत नसलेल्या मुलांना एका आजीबाईंना असा सल्ला दिलाय की ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की त्याला त्याच्या आवडीचा जोडीदार मिळावा आणि त्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्नही करतो. लग्नासाठी मुला आणि मुलीच्या एकमेकांकडून अनेक अपेक्षा असतात. त्यातील सर्वात सामान्य अपेक्षा म्हणजे मुलाची चांगली किंवा सरकारी नोकरी असावी. पण मुलं मात्र मिळाली तरी खूप अशा भूमिकेत असतात. कारण मुलांना आता मुली मिळणं कठीण झालंय. मुलींच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की त्या पूर्ण करता करता मुलांच्या नाकी नऊ येतात.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डोक्यावर पदर घेतलेली ही आजी आपल्या नातवंडाना सांगतेय की, “तुम्ही पोरी पटवा आमच्या सहमतीने लगीन लावून देतो. आता पोरीच राहिलेल्या नाहीयेत. लव्ह मॅरेज वाल्यांनी पोरीस ठेवलेल्या नाहीयेत” यावर नातवंडही हसताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Think Marathi (@think__marathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ think__marathi या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, “सध्याचे खरे वास्तव आहे.” तर आणखी एकानं, “म्हातारी माणस असा सल्ला देत असतील तर अवघड आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.