Viral video: वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण सध्या सोशल मीडियावर अशी आजीबाई व्हायरल होतो आहे, जिने असं काही करून दाखवलं आहे, ज्यामुळे तिच्या नातीही शॉक झाल्या आहेत. अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये आजी ज्या प्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. आजीबाईंनी नातींसोबत असा डान्स केलाय की आजीपुढं नातीसुद्धा फिक्या पडल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नसोहळ्याच्या हळदीमध्ये आजीसोबत तिच्या नाती सुद्धा नाचल्या आहेत. पाच सहा तरुणींसोबत पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसलेल्या आजी डान्स करत आहेत.पण या आजीच्या डान्सपुढे नातीचा डान्स देखील फिका पडला आहे. आजीने नववारी साडी नेसून डोक्यावर पदर घेत अशा काही डान्सच्या स्टेप केल्या आहेत जे पाहून सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. आजीचा हा जबरदस्त डान्स पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. ''हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला'' रात्रीच्या वेळी सुरु असलेली लग्नाची वरात दिसून येत आहे. एका बाजूला मोठ्या आवाजात डीजे सुरु आहे तर डीजेच्या समोर अनेक महिलावर्ग डिजेच्या तालावर डान्स करत आहेत. या महिलावर्गात महिलासह नवरी मुलगी तुम्हाला दिसून येत आहे. जर तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला तर दिसेल की यात एक आजी आहेत. त्याही ''हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला'' या गाण्यावर ताल धरत डान्स करत आहेत. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> माणुसकीचं अनोखं दर्शन! तरुणाने जे केलंय ते क्वचितच कोणी करेल…VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी हा व्हिडीओ सोशल मीडियावर shreeram_audio_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजीच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने म्हंटलंय, "डान्स केला आजीनी पण पदर खाली पडू नाही दिला. यालाच तर म्हणतात संस्कार" तर आणखी एकानं "आजी जोमात" अशी कमेंट केली आहे.