Viral video: सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. नेटकरी असे अनेक व्हिडीओ व्हायरल करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण सध्या सोशल मीडियावर अशी आजीबाई व्हायरल होतो आहे, जिने असं काही करून दाखवलं आहे, ज्यामुळे सगळेच शॉक झाले आहेत. अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये आजी ज्या प्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.

visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
indian railway video TT police man fight viral video
“तुम्हाला सगळचं फ्री पाहिजे का…” भर ट्रेनमध्ये टीटीने…
A little boy leaving home cried hugging his mother after Diwali holidays are over
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या! घर सोडून जाणारा चिमुकला आईला मिठी मारून रडला, माय लेकाचा VIDEO होतोय व्हायरल
check your PF balance instantly without UAN Number
EPF missed call service: UAN नंबरशिवाय तपासू शकता PF बॅलन्स, जाणून घ्या सोपी पद्धत
Women Singing Mere Humsafar Song During Antakshari
VIRAL VIDEO : जेव्हा अंताक्षरीत तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही… ‘म’ अक्षरावरून गायलं गाणं, तरुणीच्या आवाजाने नेटकऱ्यांना लावलं वेड
Video of young girl doing stunt with little kid went viral on social media
VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?
Gold Silver Price Today 08 November 2024 in Marathi
Gold Silver Price Today : लग्नसराईपूर्वी सोने -चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील दर
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Elderly Man Narrowly Escapes Death Before Vande Bharat Swooshes By shocking video
VIDEO: आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? रुळ ओलांडताना वंदे भारत एक्सप्रेस आली अन् एका निर्णयानं आजोबा असे बचावले

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजी देवीच्या मिरवणुकीमध्ये चक्क खांद्यावर बसून नाचत आहे. आजीनं नऊवारी साडी नेसून डोक्यावर टोपी घालून खांद्यावर बसून डान्स करत आहे. यावेळी आजीचा उत्साह पाहण्यासारखा आहे. या आजीच्या डान्सपुढे बाकीच्यांचा डान्स देखील फिका पडला आहे. आजीने नववारी साडी नेसून अशा काही डान्सच्या स्टेप केल्या आहेत जे पाहून सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला आहे.  एका बाजूला मोठ्या आवाजात डीजे सुरु आहे तर डीजेच्या समोर अनेक महिलावर्ग डिजेच्या तालावर डान्स करत आहेत. या महिलाही आजीला पाहतच राहिल्या आहेत. तर आजीचा हा जबरदस्त डान्स पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भयंकर! रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेच्या डोक्यात टेरेसवरुन पडली पाण्याची टाकी; VIDEO पाहून तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर saee_solkar23 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजीच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने म्हंटलंय, “आजी जोमात” अशी कमेंट केली आहे.