Haryana Viral News: हरियाणातील एका वृद्ध दाम्पत्याच्या आत्महत्येची संपुर्ण देशभराती चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर या वृद्ध जोडप्याच्या मुलांसह नातवावर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. आत्महत्येबाबतच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. पण सध्या या वृद्ध दाम्पत्याने केलेल्या आत्महत्येची चर्चा सुरु होण्याचं कारण ठरलं आहे, त्यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेली चिठ्ठी. हो कारण या वृद्ध जोडप्याने आपला नातू करोडपती असूनदेखील आम्हाला साधं जेवण मिळत नसल्याची खंत मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं आहे.

घरात भरपूर पैसा असतानादेखील मुलगा आणि नातू आपल्या वृद्ध आजी-आजोबांची काळजी घेऊ शकले नाहीत. शिवाय मुलगा आणि सुनेच्या छळाला कंटाळून अखेर या वृद्ध जोडप्याने विषाचा पेला जवळ करत आपलं आयुष्य संपवलं. मिळालेल्या माहितीनुसार, जगदीशचंद्र आर्य आणि भागली देवी अशी वृद्ध मृतांची नावे आहेत. जगदीशचंद्र हे ७८ वर्षांचे होते, तर भागली देवी ७७ वर्षांच्या होत्या. दोघेही बाढडा येथे आपल्या मुलासोबत राहत होते. आश्चर्याची बाब म्हणजे जगदीशचंद्र आर्य यांचा नातू विवेक आर्य हा आयएएस अधिकारी आहे. मुलाकडे करोडोंची संपत्ती आहे, परंतु वृद्ध दाम्पत्याला दोन वेळची भाकरीही खायला मिळत नव्हती.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
shubhangi galande bold decision of pregnancy happy single mother
मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…

हेही वाचा- डास मारण्यासाठी लावलेली कॉइल ठरली जीवघेणी; चिमुकलीसह एकाच कुटुंबातील ६ जणांचा तडफडून मृत्यू

वृद्ध दाम्पत्याने आत्महत्येपुर्वी लिहिलं…

या घटनेनंतर पोलिसांनी मयत दाम्पत्याचा एक मुलगा, दोन जावई आणि पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वृद्ध दाम्पत्याने आत्महत्येपुर्वी लिहिलेली चिठ्ठी वाचून पोलिसांनाही आपले अश्रू लपवणं कठिण झालं होतं. आजोबांनी चिठ्ठीत लिहिलं की, माझ्या मुलांकडे ३० कोटींची संपत्ती आहे, नातू आयएएस अधिकारी आहे पण त्यांना आम्हाला देण्यासाठी दोन भाकरी नाहीत.

त्यांनी पुढे लिहिलं, ‘मी जगदीशचंद्र आर्य तुम्हाला माझे दु:ख सांगतो. माझ्या मुलांची बाढडा येथे ३० कोटींची मालमत्ता आहे, पण मला देण्यासाठी त्यांच्याकडे दोन भाकरी नाहीत. मी माझ्या धाकट्या मुलासोबत राहत होतो. ६ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नीने आम्हाला काही दिवस आमच्याकडे ठेवले पण नंतर तिने मला काही कारणास्तव मारहाण केली. त्यानंतर माझा पुतण्या मला त्याच्यासोबत घेऊन गेला.’

हेही वाचा- “चित्रपट पहा आणि पैसे कमवा” घरबसल्या पैसे कमावण्याचा मोह नडला; महिलेची १२ लाखांची फसवणूक, जाणून घ्या प्रकरण

आजी-आजोबांनी मृत्यूला कोणालां जबाबदार ठरवलं?

या दाम्पत्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये सून, मुलगा आणि पुतण्याला आपल्या आत्महत्येस जबाबदार धरलं आहे. या चौघांनी आपल्या आई-वडिलांवर जे अत्याचार केले, तेवढे अत्याचार कोणत्याही मुलाने करू नयेत, असे त्यांनी लिहिले आहे. शिवाय माझी त्यांनी चिठ्ठीत विनंती केली आहे की, कोणीही आपल्या आई-वडिलांवर एवढे अत्याचार करू नका. शिवाय मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना सरकार आणि समाजाने शिक्षा करावी. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल असंही त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे.

नातू २०२१ च्या बॅचचा IAS अधिकारी –

वृद्ध दाम्पत्य मुलगा वीरेंद्रसोबत राहत होते. वीरेंद्र यांचा मुलगा विवेक आर्य हा २९२१ च्या बॅचचा IAS अधिकारी आहे. या वृद्धाच्या मृत्यूवरून सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे.