scorecardresearch

Premium

Video : शाही अंदाजात नवरा-नवरीने स्टेजवर मारली एन्ट्री, पण क्षणात घडलं असं काही…पाहुण्यांचीही धडधड वाढली

नवरी-नवरीने चक्क एका ट्रॉलीतून स्टेजवर भन्नाट एन्ट्री केल्याचं समोर आलं आहे. मात्र, नवरा-नवरीने केलेल्या या स्टंटबाजीमुळे एक भयानक घटना घडली.

Groom And Bride Injured In Marriage Ceremony
नवरा-नवरीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल. (Image-Instagram)

लग्नसमारंभ दिवसेंदिवस मॉडर्न होताना दिसत आहेत. लग्नात ग्रॅंड एन्ट्री करण्यासाठी नवरा-नवरी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करताना दिसत आहेत. याआधी लग्नमंडपात नवरा घोड्यावरून शानदार एन्ट्री करायचा. पण नुकतच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत नवरी-नवरीने चक्क एका ट्रॉलीतून स्टेजवर भन्नाट एन्ट्री केल्याचं समोर आलं आहे. मात्र, नवरा-नवरीने केलेल्या या स्टंटबाजीमुळे एक भयानक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

लग्न सोहळ्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरी दोरीला अडकवलेल्या एका ट्रॉलीतून स्टेजवर एन्ट्री करतात. ट्रॉलीच्या सर्व बाजूंनी फटाक्यांची आतषबाजी होत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. स्टेजवर बॅकग्राऊंड डान्सरही ठुमके लावताना दिसत आहेत. पण त्याचदरम्यान एक धक्कादायक घटना घडते आणि ट्रॉलीत असणारे नवरा-नवरी थेट स्टेजवरच पडतात.

monkey takes ride on ksrtc bus in haveri karnataka passengers recorded video
खचाखच भरलेल्या सरकारी बस माकडाची एन्ट्री! विंडो सीटवर बसून आनंदात केला प्रवास; पाहा Video
Shikhar Dhawan's comment on Cheteshwar Pujara's post
शिखर धवनने चेतेश्वर पुजाराची घेतली मजा! इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या ‘VIDEO’वर केली मजेशीर कमेंट
Hina khan troll after she visited andhericha raja to take darshan
“उमराह केल्यानंतर तू…”, ‘अंधेरीचा राजा’च्या दर्शनाला गेलेली हिना खान ट्रोल; युजर्स म्हणाले, “रोजचा ड्रामा…”
kareena-kapoor-about-taimur
तैमुरच्या नावामुळे झालेल्या ट्रोलिंगबद्दल करीना कपूरने प्रथमच मांडली स्वतःची बाजू; हे नाव का ठेवलं? याचंही दिलं उत्तर

नक्की वाचा – बापरे! महिलेनं मांजरीचं पिल्लू समजून चक्क बिबट्यालाच घरात पाळलं अन्…पाहा धक्कादायक Video

इथे पाहा व्हिडीओ

या व्हिडीओला १ लखा ६२ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी या व्हिडीओला वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. काही नेटकऱ्यांनी नवरा-नवरीने केलेल्या स्टंटबाजीची खिल्ली उडवली आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, नवरा-नवरी या घटनेला कधीच विसरणार नाहीत. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, स्टंटबाजी करून जीव धोक्यात टाकण्याची काय आवश्यकता होती. तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, अशा लोकांनी लग्नसोहळा म्हणजे तमाशाच करून ठेवला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Groom and bride entering the stage in a royal style but shocking incident happens in marriage ceremony watch video nss

First published on: 26-09-2023 at 15:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×