Viral Video : अंतरपाट काढला अन् तिला पाहताच नवरदेव रडू लागला; तिच्या पायावर टेकवलं डोकं, ‘हे’ होतं कारण…

या व्हायरल व्हिडीओला सहा लाखांहून अधिक व्ह्यूज असून सध्या तो चर्चेचा विषय ठरतोय.

Groom cries at wedding after looking at bride
हा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.

जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील वेगवेगळ्या ठिकाणांवरील लग्नसमारंभांमधील व्हिडीओ वेळेवेळी इंटरनेटवर व्हायरल होत असतात. कधी नवऱ्याची झालेली फजेती तर कधी लग्नामधील विचित्र पाहुणे तर कधी वरातीमधील डान्स. मात्र लग्नामधील सर्वात चिंतेचा आणि गंभीर क्षण असतो तो लग्नामधून वधू आणि वर निघताना मुलीने आई-वडीलांचा निरोप घेण्याचा क्षण. सामान्यपणे भारतामध्ये अनेकदा या प्रसंगी मुलींचे डोळे पाणवतात आणि वातावरण अगदीच गंभीर होऊन जातं. मात्र लग्नामध्ये मुलालाच रडू आलं तर? अनेकदा परदेशातील व्हिडीओमध्ये समोरुन येणाऱ्या सुंदर वधूला पाहून मुलांचे डोळे पाणवतानाचे व्हिडीओ आपण इंटरनेटवर पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर एका भारतीय लग्नामध्ये असा प्रकार घडल्याचं दिसून आलं असून हा व्हिडीओ आता व्हायरल झालाय. विशेष म्हणजे आनंदाश्रू येऊ नयेत म्हणून भारावून गेलेला हा वर डोळे पुसतो आणि मुलीच्या पायावर डोकं टेकवतानाही दिसतो.

व्हिडीओमध्ये एक रोमॅन्टीक गाणं बॅकग्राऊण्डला वाजताना ऐकू येत आहे. सामान्यपणे लग्नाच्या वेळेस मुली खूपच भावूक होताना पहायला मिळतं. मात्र या व्हिडीओत मुलगाच मुलीपेक्षा अधिक भावूक होताना दिसत आहे. आता या मुलाने इतकं भावूक होण्याचं कारण काय तर त्याची होणारी पत्नी ही लग्नानिमित्त नटून थटून आलीय आणि त्याच्यासमोर उभीय. लग्न लागल्यानंतर दोघांमधील अंतरपाट काढला जातो अन् तो थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहतो. ती फारच सुंदर दिसत असल्याने हा मुलगा क्षणभर तिला पाहत राहतो आणि ‘वाव’ असं म्हणताना व्हिडिओत दिसतो. त्यानंतर तो तिच्याकडे पाहतच असतो. आपल्या प्रेयसीला नववधूच्या रुपात पाहून तो अगदीच भावूक होतो.

अखेर भानावर आल्याप्रमाणे तो फारच इमोशनल होऊन समोर खुर्चीवर बसलेल्या वधूच्या गुडघ्यावर डोकं टेकवतो आणि त्यानंतर तो थोडा नॉर्मल होतो. नवऱ्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीकडे एखादी अप्सरा पाहिल्या प्रमाणे पाहत राहणे हे सारं पाहून हॉलमध्ये लग्नासाठी आलेले नातेवाईक हसू लागतात. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, लग्न करणार मुलगा आणि मुलगी कोण आहे याबद्दल काहीही माहिती समोर आलेली नसली तरी हा जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by WedWise.co.in (@wedwise)

हा व्हिडीओ जुना असला तरी सध्या तो पुन्हा चर्चेत आल्याचं चित्र दिसत आहे. या व्हिडीओला मागील सहा महिन्यांमध्ये ३० हजारांहून अधिक लाईक्स आहेत. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडत असून अनेकांनी त्यावर नवऱ्या मुलाने दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओला सहा लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Groom cries at wedding after looking at bride for this reason watch viral video scsg