Viral video: मुलीचं लग्न लावताना लेक घरातून जातेय यापेक्षा एक हक्काचा मुलगा आपल्या कुटुंबात प्रवेश करत आहे, ही भावना वधूच्या मात्या-पित्यांना जेव्हा येते तेव्हा एका उत्तम जावयाचा शोध लागलेला असतो असं समजावं. चांगला मुलगा, पती, भाऊ, मित्र अशा अनेक भूमिका निभावत असतानाच जावयाची भूमिकाही उत्तम वठवता येणं आवश्यक आहे. अशाच एका जावयचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये त्यानं जे केलंय ते पाहून तुम्हीही म्हणाल, प्रत्येक मुलीच्या बापाला असाच जावई मिळावा!

बाप-लेकीचं नातं नेहमीच खूप खास समजलं जातं. बाप गरीब असो वा श्रीमंत तो आपल्या लेकीला नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. खरं तर, एखाद्या मुलीवर तिच्या वडिलांएवढं प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. पण, आपल्या वडिलांइतकाच आपल्याला जीव लावणारा जोडीदार मिळावा, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. ही इच्छा अनेकदा पूर्णही होते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जावई स्टेजवर होणाऱ्या बायकोसाठी आपल्या सासऱ्यांसमोरच भन्नाट असा डान्स करत आहे. यावेळी जावयाचं आपल्या मुलीवरील प्रेम पाहून वडीलही खूश झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण जावई असावा तर असा, असं म्हणताना दिसत आहेत. पूर्वीच्या काळी ‘जावई रुसणं’ हा जणू काही एक विधीच असायचा. म्हणजे लग्नाच्या मंडपात ऐन मुहूर्ताच्या वेळी नवरा मुलगा स्कूटर, फ्रीज, टीव्ही किंवा सोन्याचा एखादा दागिना अशा कुठल्याशा महागडया वस्तूसाठी अडून बसत असे. एवढंच काय तर अमूकच एक कोल्ड्रिंक प्यायला हवं म्हणूनही अडून बसलेल्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत किंवा अनुभवल्या आहेत.आपल्या घरातल्या आजीकडून अशा अनेक लग्नांच्या कहाण्या ऐकायला मिळतील. खरं तर अडवणूक करण्याच्या या सा-या गोष्टी पूर्वनियोजित असत. तेव्हाचा काळ अगदीच वेगळा होता. शिक्षणानं आणि बदलत्या राहणीमानानं या गोष्टी इतिहासजमा केल्या आहेत.आजची मुलं प्रेयसीच्या वडिलांना ‘सर’ म्हणतात आणि लग्न ठरल्यावर सरळ ‘बाबा’ किंवा ‘पप्पा’ बनवून टाकतात.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by jitendra jadaun ⭐ (@jitendra_jadaun)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील jitendra_jadaun या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.