Groom dance video: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. आपल्या जोडीदारासाठी या खास दिवशी डान्स करीत वधू-वर आपला आनंद द्विगुणीत करतात.

सोशल मीडियावर अनेकदा लग्नसोहळ्यातील असे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक डान्स परफॉर्मन्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक वर डान्स फ्लोअरवर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करताना दिसला. त्यानं स्टेजवर आपल्या दमदार डान्स मूव्हजनी प्रेक्षक, तसेच नेटिझन्सची मनं जिंकली आहेत.

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”

हेही वाचा… “चोर अजूनही डिप्रेशनमध्ये आहे”, घरात चोरी होऊ नये म्हणून पठ्ठ्याने केला जबरदस्त जुगाड! लॉकरचा दरवाजा उघडला अन्…, पाहा VIDEO

नवरदेवाने जिंकलं मन

नवरदेवाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. व्हिडीओमध्ये सूट घातलेला एक नवरदेव डान्स फ्लोअरवर जबरदस्त डान्स करताना दिसतोय. शाहीद कपूर आणि ‘तेरी बातों मै ऐसा उलझा जिया’ या चित्रपटातील ‘अखियां गुलाब’ या गाण्यावर डान्स स्टेप्स करत थिरकताना दिसतोय.

हा व्हिडीओ @the_shaadi_shakers या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “breaking it down like a pro- this groom knows how to move!” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला तब्बल १५.६ दशलक्ष व्ह्युज मिळाले आहेत.

हेही वाचा… “मुलींचे असले कसले संस्कार”, वर्गात बेंचवर चढली अन्…, तरुणीने ओलांडली मर्यादा, VIDEO पाहून सांगा चूक कोणाची

युजर्सच्या प्रतिक्रिया

नवरदेवाच्या या डान्सवर फिदा होऊन अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “काय भारी नाचलाय नवरदेव.” दुसऱ्यानं, “प्रेमात पडलेले पुरुष आपल्या बायकोसाठी सर्व काही करतात,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत “यावरून कळतं की, शरीर कसंही असो; आत्मविश्वास कमी झाला नाही पाहिजे.”

Story img Loader