वऱ्हाडींना मागे टाकत नवरदेव वरातीत एकटाच नाचू लागला, या गाण्यावरचा क्लासिकल डान्स VIDEO VIRAL

सजून धजून नवरदेव ज्याप्रमाणे आपल्याच वरातीत नाचतोय हे पाहून लोक थक्क होऊ लागले आहेत. इतकंच काय त्याच्या मागे उभी असलेली इतर वऱ्हाडी मंडळी देखील पाहतच राहिली. हा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच.

Groom-Video-Viral
(Photo: Youtube/ Fun Tv )

सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोक लोटपोट होऊन हसत आहेत. कारण यात नवरदेव आपल्या वरातीत सर्व वऱ्हाडींना मागे टाकत एकटात डान्स करताना दिसून येतोय. त्याचा डान्सही खूपच मजेदार आहे. सजून धजून नवरदेव ज्याप्रमाणे आपल्याच वरातीत नाचतोय हे पाहून लोक थक्क होऊ लागले आहेत. इतकंच काय त्याच्या मागे उभी असलेली इतर वऱ्हाडी मंडळी देखील पाहतच राहिली. हा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बहुतेक लग्नांमध्ये वरातीत वऱ्हाडीं आणि मित्र मंडळी नाचून लग्नाची शोभा वाढवतात, पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात वऱ्हाडी मंडळी नव्हे तर चक्क स्वतः नवराच आपल्या वरातीत डान्स करून चर्चेत आलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरदेव आंटी नंबर वनच्या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. या गाण्यात मध्येच तो क्लासिकल डान्स स्टेप्स करताना दिसतोय. त्याचं क्लासिकल मिक्स डान्स लोकांना खूपच आवडू लागला आहे. डान्स करता करता या नवरदेवाने त्याच्या चेहऱ्यावर गोड एक्सप्रेशन्स दिले आहेत. त्याचा हा एक्सप्रेशन्ससह डान्स सोशल मीडियावर बराच चर्चेत आलाय.

आणखी वाचा : चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन पदवी घेण्यासाठी आली महिला, भावूक करणारा हा VIRAL VIDEO पाहाच

नवरदेवाचा असा अप्रतिम डान्स करताना पाहून वरातीत इतर लोकही सामील झाले आहेत. Fun Tv नावाच्या युट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. नवरदेवाचा हा डान्स पाहून सारेच जण त्याचे पॅन बनले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी यावर वेगवेगळे कमेंट्स शेअर करण्यास सुरूवात केली आहे. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “काय भाऊ, तुम्ही डान्स कुठून शिकलात”, तर दुसऱ्या यूजरने कमेंट करत लिहिले की, “तुझा डान्स पाहून आनंद झाला.” या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.

आणखी वाचा : वानर आणि लहान मुलामध्ये रंगली जबरदस्त फाईट, लढाईचा कसा झाला शेवट? पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : परवानगीशिवाय काढत होती फोटो, मग हत्तीने तरूणीला चांगलाच धडा शिकवला

हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला तीन लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. कमेंट करताना एका यूजरने लिहिले – काय आहे भाऊ, तुम्ही डान्स कुठून शिकलात, तर दुसऱ्या यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘तुझा डान्स पाहून आनंद झाला. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Groom dance on classical song on his own wedding people surprised video viral prp

Next Story
अख्ख्या शाळेत दोन तरुणांनी पेंट करून लिहिलं ‘सॉरी’; पोलिसांकडून शोध सुरू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी