Groom haladi dance video: सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचे अनेक असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यात दोघंही लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी वधू आणि वर दोन्हीकडून प्रयत्न सुरु असतात. आपल्या लग्नात सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा सगळ्याच कपलचा प्रयत्न असतो. काहीतरी वेगळं हटके करण्याचा नादात हे नको त्या आयडिया वापरतात आणि व्हायरल होतात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामध्ये कोकणातल्या हळदीच्या कार्यक्रमातला नवरदेवाचा डान्स सध्या व्हायरल होतोय.

पूर्वी कोकणातल्या गावं किंवा वाड्यावर होणारी लग्नं सामूहिक सहकार्याचा उत्तम नमुना असायचा. मांडव घालणं, जेवणावळीचा स्वयंपाक करणं किंवा लग्न होत असलेल्या गावासह आसपासच्या गावांमध्ये निमंत्रण पत्रिका पोहोचवण्यापर्यंत विविध कामं ग्रामस्थ नियोजनपूर्वक वाटून घायचे आणि ती बिनबोभाटपणे पारही पाडायचे. लग्नाच्या आदल्या दिवशी साखरपुडा किंवा हळदीसारखा कार्यक्रमही नवरामुलगा किंवा मुलीच्या घराच्या अंगणातच व्हायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी गावात उपलब्ध असलेल्या वाद्यांच्या गजरात विवाह सोहळा संपन्न व्हायचा. त्यामुळे लग्नात फार मोठय़ा प्रमाणावर उधळपट्टी होताना दिसत नव्हती.

सोशल मिडीयावरील लग्नाचे मजेशीर व्हिडीओ नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या सोशल मिडीयावर लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नवरदेव अक्षरश: खांद्यावर बसून नाचताना दिसत आहे. नवरदेवाचा उत्साह पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणताय जेव्हा नवरदेव विसरतो हळद त्याचीच आहे. हा नवरदेव स्वत:च्याच लग्नात भान हरपून नाचत आहे. नवऱ्याने इतर सर्वांना डान्स मध्ये अक्षरश: फेल केले आहे. या व्हिडीओला खूपच पाहिले जात असून पसंद केले जास्त आहे. त्याच्या मागे डान्स करणाऱ्या तरुणी सुद्धा खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे पण नवरदेवाने सर्वांचे लक्ष त्याच्या:कडे वेधून घेतले आहे

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ _kokanimulga नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एकानं “थांब भावा जरा हळू” अशी प्रतिक्रिया दिली आहे.