Viral video: सध्याच्या काळात प्रत्येक लग्नात एक वेगळीच धमाल दिसून येते. नवरा- नवरी असो वा त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्य सर्व असे फुल उत्साहात असतात. मग कधी लग्नातील डान्स करणे असो त्यात प्रत्येकजण आनंदाने सहभागी होत असतो, सध्या सोशल मीडियावर असाच एका लग्नामधील नवरदेवाचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नवरदेवाचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल काय तो त्याचा उत्साह..

गाणं लागल्यावर, ढोलताशा वाजल्यावर आपलं शरीर थिरकत नाही असं होतच नाही. डान्स येवो न येवो पण ढोलताशाचा आवाज कानावर पडताच अंगात जणू संचारतंच. बाकी कोणता प्रोफेशनल डान्स नाही आला तरी नागिण आणि गणपती डान्स तर प्रत्येकाला हमखास येतोच येतो. पण सध्या सोशल मीडियावर अशाच एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्याचा डान्स पाहून याला आवरा असंच तुम्हीही म्हणाल. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल पण हसूही आवरणार नाही. अगदी पोट धरून पोट दुखेपर्यंत तुम्ही हसाल.

लग्नात नागीण डान्स केला नाही तर तुम्ही काय नाचलात राव? या डान्सशिवाय वरातीला मज्जा नाही आणि हे वाचणारे अर्ध्याहून अधिक लोक या मताशी सहमतही असतील. जोपर्यंत नागीण डान्स करून धिंगाणा घालत नाही, तोपर्यंत काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. तेव्हा एरव्ही आपल्याला नाच वगैरे जमत नसला तरी हा एक डान्स मात्र आपल्याला उत्तम जमतो असं म्हटलं तर चुकं ठरणार नाही. त्यातून लग्नात अशी हौस भागवून घेणाऱ्यांची आपल्याकडे काही कमी नाही, पण आपल्याच लग्नात नागीण डान्स करण्याची हौस करणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” या जुन्या मराठी गाण्यावर नवरदेवानं आपल्या हळदीच्या कार्यक्रमात जबरदस्त असा डान्स केला आहे. यावेळी नवरदेवाचा डान्स आणि एक्सप्रेशन पाहून नातेवाईक हसू रोखू शकले नाहीत. तसेच यावेळी नवरीची रिअॅक्शनही पाहण्यासारखी आहे.

पाहा व्हिडीओ

तसं डान्स करायला अनेकांना आवडतं. पण असा डान्स तुम्ही कधी पाहिला नसेल आणि असा डान्स कुणाला करायलाही आवडणार नाही. marathi_memer_2.0 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.