Groom forgot kurta at wedding: असं अनेकदा झालं असेल की तुम्ही मिटिंगला जाण्यासाठी घाईत असाल आणि कामावर पोहोचल्यावर तुम्हाला आठवलंय की तुम्ही महत्त्वाची फाइल घेऊन जाण्यास विसरले आहात. अशाप्रकारच्या अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आपण महत्त्वाच्या गोष्टी अनावधानाने विसरतो आणि मग त्या परिस्थितीत नेमकं काय करावं हा प्रश्न उभा राहतो.

लग्न म्हटलं की घाईगडबड आलीच. सगळी तयारी करूनही शेवटच्या मिनिटांपर्यंत लग्नघरात काही ना काही राहिलेलंच असतं. सध्या असाच काहीसा प्रकार बेंगळुरूमध्ये एका नवरदेवाबरोबर घडला.

Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
Abhidnya bhave Anniversary Post
“My सर्वस्व मेहुल पै…”, लग्नाच्या वाढदिवशी अभिज्ञा भावेची पतीसाठी रोमँटिक पोस्ट; मराठी कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल

हेही वाचा… लग्नात आलेल्या पाहुण्याचा ‘हा’ कसला पाहुणचार? वीजेच्या खांबाला बांधलं अन् धू धू धुतलं, VIDEOमध्ये पाहा नेमकं काय घडलं

…अन् नवरदेव कुर्ताच विसरला

बेंगळुरूमधील एका वराने खास दिवशी आपला हळदीचा कुर्ता विसरल्याचा उल्लेख केला. रामनाथ शेनॉय याने @ramnathshenoy22 या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “माझ्या लग्नाला ३६ तास आहेत आणि @SwiggyInstamart खरंच मंडपात बसण्यास पात्र आहेत!” अशा कॅप्शनने त्याने सुरुवात केली.

यानंतर त्याने पुढे लिहिलं, “मी माझा कुर्ता विसरलो म्हणून हळदीच्या दिवशी सकाळी गोंधळ झाला. कुटुंबातले सगळे माझ्यावर रागवलेले, पण तेवढ्यात इन्स्टामार्ट माझ्या चांगल्या दिवशी मदतीला आला आणि अवघ्या आठ मिनिटांत मान्यवरांचा कुर्ता डिलिव्हर केला आणि १० मिनिटांनंतर या फोटोत तुम्ही मला त्या कुर्त्यावर पाहू शकता.”

“त्यानंतर हळदीचा कार्यक्रम झाला आणि माझ्याकडे बदलण्यासाठी अंतर्वस्त्र नव्हते. स्विगीने अवघ्या १० मिनिटांत नवे कोरे अंतर्वस्त्र डिलिव्हर केले. ज्या पद्धतीने त्यांनी माझी मदत केली, मी त्यांना माझ्या इनव्हाईट लिस्टमध्ये ॲड करायला मागेपुढे पाहणार नाही,” असंही तो म्हणाला.

हेही वाचा… सीट मिळावी म्हणून ओलांडली मर्यादा! तरुणाने भरमेट्रोत ‘असं’ काही केलं की महिलांनी जागाच सोडली, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

नवरदेवाची ही पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “नवरदेव कुर्ता विसरला, यासाठी तुला आयुष्यभर कुटुंबीयांची बोलणी खावी लागणार आहेत.” तर दुसऱ्याने “चांगलं झालं, पण यावरून कळतं की तुम्ही आयोजन करण्यात किती वाईट आहात,” अशी कमेंट केली. यावर स्विगीकडूनही रिप्लाय आला. त्यांनी कमेंट करत लिहिलं, “तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप काही आहे, रामनाथ! आम्ही आमच्या सर्व वापरकर्त्यांसाठी खूप चांगला आणि आनंददायक अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

Story img Loader