सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात तर काही व्हिडीओंना पाहून आपण खळखळून हसायला लागतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा विशेष आहे. लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारतीय पद्धतीनं केलेल्या पारंपारिक लग्नात नवरी आणि नवरदेवानं एकमेकांना किस करावं अशी कोणतीही प्रथा किंवा परंपरा नाही. आज आम्ही तुम्हाला आज एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्हीही विचारात पडाल, की हिंदू विवाह पद्धतीत ही प्रथा कधीपासून सुरू झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेजवर नवरा नवरी बसले असून त्यांच्या लग्नाचा विधी सुरु आहे. या दरम्यान नवरदेव नवरीला मंगळसूत्र घलताना हळूच किस करतो. नवरा मुलगा लग्नाचे विधी चालू असताना सर्वांसमोर नवरीला किस करतो . यावेळी नवरीही लाजताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या जोडप्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: महाकाय अजगरानं वृद्धाच्या मानेला घातला वेढा, हल्ल्याचा थरार कॅमेरात कैद

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ट्विटरवर @dreamz_unite या यूजर्सने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom kisses the bride in front of everyone during the wedding ceremony video viral on social media watch srk
Show comments