scorecardresearch

VIRAL VIDEO : नवरीला पाहून नवरदेवाला बसला जोर का झटका, समोर येऊन केलं असं काही…

आपली होणारी पत्नी लग्नाच्या दिवशी नववधूच्या वेशभूषेत कशी दिसतेय, या उत्सुकतेत नवरदेव चक्क नवरीच्या रूममध्ये पोहोचतो. हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य आल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत.

Groom-Bride-Viral
(Photo: Instagram/ weddingbells2022_)

लग्नामधील अनेक खतरनाक व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी नवरदेव-नवरीच्या जेवणाचा व्हिडीओ, कधी लग्नादरम्यानचे मजेशीर क्षण तर कधी ब्युटी पार्लरमधून येणाऱ्या नवरीचा लूक अशा नानाप्रकारचे लग्नाशी संबंधीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. लग्नातील व्हिडीओ युजर्सना बघायला देखील प्रचंड आवडतात. सध्या असाच एक खास लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य आल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत.

अनेकदा तुम्ही पाहिले असेल की काही लोक खूप भावनिक असतात आणि त्यांच्या भावनांवर त्यांचे अजिबात नियंत्रण देखील नसते. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. आपली होणारी पत्नी लग्नाच्या दिवशी नववधूच्या वेशभूषेत कशी दिसतेय, या उत्सुकतेत नवरदेव चक्क नवरीच्या रूममध्ये पोहोचतो. हा क्षण एन्जॉय करण्यासाठी आलेला नवरदेव नवरीला पाहून हैराण होतो. लग्नाच्या दिवशी आपल्या होणाऱ्या बायकोचं नववधूच्या वेशभूषेतलं सौंदर्य पाहून नवरदेव थक्क होतो. या व्हिडीओमधून नवरदेवाचे आपल्या होणाऱ्या बायकोवरील प्रेम दिसून येत आहे.

आणखी वाचा : रस्त्यावर फिरताना दिसला कांगारू, हा VIRAL VIDEO पाहून लोक विचारू लागले, ‘भारतात कसा आला?’

लग्नाच्या आधी आपल्या होणाऱ्या बायकोला एकदा तरी भेटायचंच असं या नवरदेवाने ठरवंल होतं. काही वेळात नवरी लग्न मंडपात सर्व पाहूण्यांसमोर येणार तितक्यात नवरदेव स्वतःच नवरीच्या खोलीत पोहोचतो. यावेळी नवरी सुद्धा आश्चक्यचकित होते. नववधूच्या वेशभूषेत ही नवरी अगदी सजून धजून बसलेली होती तितक्यात नवरदेवाने एन्ट्री मारली. आनंदाच्या भरात हा नवरदेव आपल्या तोंडावर हात ठेवू लागतो आणि नवरीला मिठी मारू लागतो.

आणखी वाचा : पुन्हा परत येणार का डायनासोर? हा VIRAL VIDEO खरा की खोटा यावर चर्चेला उधाण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : या दिव्यांग आजोबांच्या इच्छाशक्तीला जगाचा सलाम, हा VIRAL VIDEO जिंकेल तुमचंही मन

हा व्हिडीओ weddingbells2022_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ अगदी वाऱ्यासारखा सोशल मीडियावर पसरू लागलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Groom lost his senses after seeing the bride did such thing in front her prp

ताज्या बातम्या