लग्नात अनेक रूढी-प्रथा असतात ज्या कित्येक काळापासून चालत आल्या आहेत. प्रत्येक प्रथा महत्त्वपूर्ण असते आणि त्याचे पालन करणे आपली परंपरा आहे. तथापि, अनेकदा या रूढी-परंपरांपासून वाचण्यासाठी आपण काही ना काही जुगाड शोधण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काही प्रथा या खूपच मजेशीर असतात आणि आपण त्यांचा पुरेपूर आनंद घेतो. अशीच एक प्रथा म्हणजे लग्नात नवरदेवाचे बूट लपवणे. वधूच्या बहिणी आणि मैत्रिणी वरचे चप्पल लपवतात आणि त्याच्याकडून पैशांची मागणी करतात. अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावेळी नवरदेवाचे बूट लपवल्यानंतर मुलीकडच्यांनी वराकडे तब्बल ३००० डॉलर्सची मागणी केली. यावेळी वर आणि त्याच्या घरच्यांनी असे काही म्हटले की नववधूला राग आला आणि तिने सर्वांसमोरच वराची बोलती बंद केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की वधू आपल्या बहिणीसोबत उभी राहून तिच्या भावोजीकडून पैसे मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करतेय. मेव्हणी आपल्या भावोजीकडून तब्बल ३ हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास २ लाख २० हजार रुपये मागत आहे. ही किंमत ऐकल्यानंतर मुलाकडची मंडळी हैराण झाली. यावर वराने असे काही म्हटले ज्याने वधू संतापली. वर म्हणाला, “माझ्याकडे चपलांचा आणखी एक जोड आहे. त्यातच मी आनंदी आहे. खूप खूप धन्यवाद.” यावर वधूने जे उत्तर दिले ते ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
wife does not wear saree of my choice husband created ruckus matter reached police station couple goes for divorce
पत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
Rajendra Pawar vs Ajit Pawar
“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…

एवढ्या लहान वयातही ही मुलगी करतेय इतका ड्रामा; व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले

एका मिनिटात ‘या’ तरुणाने करून दाखवले असे काही; भल्याभल्यांना फुटेल घाम

वराचे उत्तर ऐकताच वधूचा पारा चढला आणि तिने वराला जबरदस्त उत्तर दिले. वधू म्हणाली, “जर तुमच्याकडे चपलांचा आणखी एक जोड आहे, तर तुमच्याकडे बायकोचीही आणखी एक जोड आहे का?” हे ऐकल्यानंतर मुलाकडच्या लोकांचा चेहरा उताराला. तर मुलीकडचे जोरजोरात हसू लागले. वधूचं हे उत्तर ऐकून वर पुन्हा कधी असे चुकून सुद्धा बोलणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर shaadijitters या अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ अपलोड होताच खूप लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला असून अनेकांनी यावर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.