Groom Funny Video : कोणत्याही लग्नात नवरदेवाची एन्ट्री ही पाहण्यासारखी असते, कधी तो सजून धजून घोड्यावरून तर कधी शाही थाटात लग्नमंडपात येतो. काहीवेळा आलिशान गाड्यांचा ताफा घेऊन नवरदेव एन्ट्री घेतो, त्यामुळे लग्नमंडपात पहिल्यांदा येणारा नवरदेव आधी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो, त्यानंतर नवरी. पण, सोशल मीडियावर नुकताच एका नवरदेवाचा असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात त्याच्या एन्ट्रीने सर्वांनाच हसवले; कारण तो नवरदेव कमी आणि एलईडी लाईट्सचा खांब अधिक वाटत होता. नवरदेवाने नेमकं असं काय केलं होतं जाणून घेऊया…
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरदेवाचा पूर्णपणे वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. तुम्ही आतापर्यंत नवरदेवाला सुटा-बुटात किंवा पारंपरिक पोशाखात बघितले असेल, पण या व्हिडीओतील नवरदेव काही औरच दिसतोय. त्याला पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की, हा नवरदेव आहे की एलईडी लाईट्सचं दुकान. कारण त्याने लग्नाच्या पोशाखावर संपूर्ण रंगीबेरंगी चमकदार लाइट्स जोडल्या आहेत. नवरदेवाच्या कपड्यांवर, खांद्यांवर आणि डोक्यावर सर्वत्र रंगीबेरंगी एलईडी लाइट्स लावल्या आहेत, ज्या इतक्या चमकतायत की वरातीत लोकांचं लक्ष फक्त आणि फक्त नवरदेवाकडे जातंय. दुरून पाहताना जणू काही लाइटसचा एक चालता फिरता खांबच चालतोय की काय असा भास होतोय.
नवरदेव लाईट्सचा पोशाख अंगावर घालून फिरतोय
व्हिडीओमध्ये नवरदेव हा लाईट्सचा पोशाख अंगावर घालून फिरतोय, ज्याला पाहून लोकही चकित झालेत; अनेकांना तर हसू आवरणं अवघड झालंय. @hemlatajk या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही भन्नाट भन्नाट कमेंट्स करताना दिसतायत.
अनेकांनी गमतीत लिहिले की, नवरदेवाची वरात जणू काही थेट वीज विभागातूनच आली आहे आणि त्याचा हा एकच पोशाख संपूर्ण परिसराला प्रकाशमान करतोय. दुसऱ्या एकाने लिहिले की, लग्नादरम्यान लाईट गेली तर नवरदेवाला स्टेजवर उभे करा, जेणेकरून सगळीकडे उजेड पडेल.
