Viral Video: लग्नसमारंभ म्हटलं की नाच-गाणी, मजा-मस्ती, दंगा पाहायला मिळतोच. लग्नातील विविध प्रथांमध्ये खूप गमतीशीर गोष्टी पाहायला मिळतात. लग्नात हार घालण्यावरूनही अनेकदा गोंधळ उडतो; तर कधी नवऱ्या मुलाचे बूट चोरण्यावरूनही राडा झालेला पाहायला मिळतो. अनेकदा काही लग्नांमध्ये वर पक्ष आणि वधू पक्षामध्ये भांडणं झालेली पाहायला मिळतात. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही तरुण चक्क लग्न लावणाऱ्या गुरुजींसोबत मस्ती करताना दिसत आहेत.

लग्न म्हटलं की अनेकदा त्यात वर-वधू पक्षामध्ये मानअपमानावरून, तर कधी देण्याघेण्यावरून रुसवे फुगवे होतात. अनेकदा या गोष्टींवरून लग्नदेखील थांबवलं जातं. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येदेखील लग्न लावणारे गुरुजीच रुसलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न मंडपात गुरुजी वर-वधूचे लग्न लावत आहेत, मात्र त्यावेळी त्यांच्या मागे येऊन काही तरुण मुलं त्यांच्या डोक्यात एक पिशवी घालतात. त्यानंतर पुढच्या क्लिपमध्ये पुन्हा ती मुलं त्यांच्या अंगावर रंग टाकतात, त्यावेळी ते खूप चिडतात. पुढच्या क्लिपमध्ये तिच मुलं त्यांच्या अंगावर एक कपडा टाकतात. त्यानंतर मात्र त्यांचा पारा चढतो आणि ते चिडून लग्न अर्धवट सोडून मंडपातून निघून जातात. पुढे काही वरिष्ठ मंडळी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, पण ते कोणाचच ऐकत नाहीत.

हेही वाचा: अय्या, किती गोड! ‘गुलाबी साडी’ गाण्यावर चिमुकल्याचे हटके एक्स्प्रेशन आणि डान्स; VIDEO पाहून म्हणाल, “याच्यापुढे सारे फिके”

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून इन्स्टाग्रामवरील @swaroop_c_ckm007 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच यावर एक लाखाहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. शिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर संताप व्यक्त करत आहेत. लग्न हे खूप पवित्र शुभ कार्य मानले जाते, पण ते सुरू असताना लग्न लावणाऱ्या गुरुजींचा असा अपमान करणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा असल्याचे अनेक जण म्हणताना दिसत आहेत.