Viral video: आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा य मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.लग्नादरम्यान नवरदेवाच्या मित्रांनी चक्क स्टेजवरच फटाके फोडले आहेत.

लग्नसमारंभात अनेकदा काही प्रसंग असे घडतात, जे आठवून आयुष्यभर हसू येतं. लग्नात झालेल्या या गमतींचा व्हिडिओ कॅमेऱ्यात झाल्यावर तर हे क्षण आणखीच मजेशीर बनतात. बहुतेक लग्नसमारंभांमध्ये नवरदेवाचे मित्र काहीतरी मस्करी करण्याच्या मूडमध्ये असतात आणि हा त्यांचा हक्कही समजला जातो. मात्र, अनेकदा हेच मित्र असा काहीतरी प्रताप करतात ज्याचा आपण विचारही करू शकत नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,स्टेजवर नवरा नवरीसह नातेवाईक उभे आहेत. लग्नाच्या सर्व विधी पार पडत आहेत. अशातच स्टेजच्या कडेला नवरदेवाचे मित्र फाटक्यांचं बॉक्स ठेवतात. त्यानंतर थोड्याच वेळात हे फटाके स्टेजवर फुटायला सुरुवात झाली. यावेळी नवरा नवरीसह नातेवाईकही घाबरले. मात्र भटजी यावर रागवले आणि हे फटाक्याचं बॉक्स बाजूला करायला पुढे आले. मात्र त्याच क्षणी आणखी एक फटका फुटला आणि त्यांच्या डोळ्यात उडाला. अशाप्रकारे कुठेही मजा मस्करी करणे अंगलट येऊ शकते एखाद्याचे नुकसान होऊ शकते याचेच हे उदाहरण

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DJhVEvpND6k/?utm_source=ig_web_copy_link

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर yash_ubare_50 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करून लोक नवरदेवाची मस्करी करत आहेत. एकानं म्हटंलय, “अशा मित्रांना लग्नातच बोलवायचं नाही.” तर आणखी एकानं “नवरदेवानेही याच्या लग्नात अशीच मस्करी केली असेल म्हणूनच मित्र बदला घेत आहेत.” यासोबत इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.