lion Viral Video : इंटरनेटवर व्हायरल होणारे व्हिडीओ लोकांचे मनोरंजन करतात. पण काही व्हिडीओ असे असतात, ज्यांना पाहिल्यानंतर अनेकांचा थरकाप उडतो. घरात असलेल्या पाळीव प्राण्यांसोबत खेळायला सर्वांनाच आवडत असेल, पण काही जण थेट शिकार करणाऱ्या हिंस्र प्राण्यांशी भिडतात. एका कपलनेही अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार केला असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. एका पिंजऱ्या सिंहाचा कळप फिरत असतो आणि त्याचदरम्यान एक व्यक्ती त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडतो.

सिंहाला दरवाजा उघडल्याचे दिसताच तो काही सेकंदातच पिंजऱ्याच्या बाहेर येतो आणि भलतच घडतं. सिंहासोबत खेळ करायला गेलेल्या कपलला जराही अंदाज नसेल की, सिंह दरवाज्याबाहेर आल्यावर अशाप्रकारचे काही करेल. जंगलाचा राजा सिंह नेहमीच शिकारीच्या शोधात असतो. त्याला संधी मिळताच तो समोर दिसेल त्याच्यावर पंजा मारतो. आता या सिंहाने पिंजरा उघडल्यानंतर काय केलं? ते व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एकदा पाहाच.

A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
a man cracking coconut with his head shocking video goes viral
धक्कादायक! डोक्यावर नारळ फोडले अन् पुढच्या क्षणी खाली पडला, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
girl playing holi with boyfriend while standing on moving scooter
चालत्या स्कुटीवर उभे राहून तरुणाला रंग लावत होती तरुणी! अचानक ब्रेक दाबला अन्…. व्हिडीओमध्ये बघा पुढे काय घडले
drug dealer died because of heart attack after seeing the police
पुणे : पोलिसांना पाहताच अमली पदार्थ विक्रेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सिंहाचा हा व्हिडीओ @saqibahmed5267 या नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एक कपल सिंहाच्या पिंजऱ्याजवळ गेले असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. सफेद कपडे घातलेल्या माणूस सिंह हा जंगलाचा राजा आहे, हे कदाचित विसरुनच गेला असावा, कारण शिकार करणाऱ्या सिंहाला त्याने पिंजरा उघडून बाहेर जाण्याची संधी दिली. पण त्या व्यक्तीलाही कल्पना नसेल की, सिंह पिंजऱ्य़ाबाहेर आल्यावर असं काही भलतच करेल. पिंजरा उघडल्यानंतर सिंह या कपलच्या सभोवताली फिरताना या व्हिड़ीओत दिसत आहे. पण सिंहाला पाहून त्या महिलेचा चांगलाच थरकाप उडाला आहे. सिंह समोर दिसला की अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. असाच काहिसा प्रकार या कपलसोबत झाल्याचं सुरुवातीला या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – Viral Video: साडी नेसून महिलेनं नदीत मारली कोलांटी उडी…स्विमिंगचा व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

इथे पाहा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 15 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. सिंहाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने म्हटलं, “अशाप्रकारचे प्राणी एक दिवस जीवनाचे दुश्मन बनतात.” पिंजऱ्यात सिंहाचा कळफ फिरत असताना त्या व्यक्तीने अचानक पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. पण चार-पाच सिंह पिंजऱ्यात फिरत असताना एक सिंह मात्र पिंजऱ्याबाहेर आला.

सिंहाचा शिकार करण्याचा मूड नसल्याने त्याने या कपलवर कोणत्याही प्रकारचा जीवघेणा हल्ला केला नाही. तर सिंह त्या व्यक्तीसोबत बागडत असल्याचा या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सिंहासारख्या प्राण्यासोबत मस्ती करताना अनेकांचा मृत्यू झाला आहे. पण या सिंहाने कोणत्याही प्रकारचा हल्ला या कपलवर केला नाही. पण अशाप्रकारच्या प्राण्यांपासून दूर राहणेच चांगलं ठरतं. कारण सिंहासारखा प्राणी कधी हल्ला करेल, याचा अंदाज लावता येणार नाही.