scorecardresearch

Video: कपड्यांमुळे निर्दयी जमावाची मुलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण, म्हणाले “असे कपडे पुरुषांना…”

एका व्यक्तीने लाथ मारल्यानंतर मुलगी कारला धडकल्याचंही व्हिडीओत दिसत आहे

Video: कपड्यांमुळे निर्दयी जमावाची मुलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण, म्हणाले “असे कपडे पुरुषांना…”
व्हिडीओमध्ये एका १७ वर्षांच्या मुलीसोबत पुरुषांचा जमाव गैरवर्तन करताना दिसत आहे. (Photo : Twitter)

एकीकडे इराणमध्ये महिला हिजाबच्या विरोधात निदर्शने करत आहेत, तर दुसरीकडे इराकमधील एका मुलीला पुरुषांच्या जमावाने तिने घातलेल्या कपड्यांमुळे लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर मुलीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एका १७ वर्षांच्या मुलीसोबत पुरुषांचा जमाव गैरवर्तन करताना दिसत आहे. अनेकजण या मुलीला तिच्या कपड्यांमुळे लाथा मारत, शिवीगाळ करत असल्याचंही दिसत आहे. मुलीचा छळ करणाऱ्यापैकीच एकाने या घटनेचा व्हिडिओही बनवला आहे. हे प्रकरण इराकमधील कुर्दिस्तानशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे वृत्त आजतकने दिले आहे.

हेही वाचा- ‘Flipkart’ला निष्काळजीपणा भोवला! १२,४९९ रुपयांचा मोबाईल न दिल्याने महिलेला द्यावे लागले ४२ हजार

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी एका मोटारसायकल रेसच्या कार्यक्रमात आली होती, तेव्हा तिच्यासोबत हा गैरप्रकार घडला. या कार्यक्रमाला येताना तिने काळा टॉप, ब्राऊन कार्डिगन आणि स्कर्ट घातला होता. ही मुलगी तिच्या कपड्यांनी रायडर्सचे लक्ष विचलीत करत होती असा आरोप तिच्यावर जमावाकडून लावण्यात आला आहे. म्हणून त्या मुलीला लोक कार्यक्रम स्थळापासून लांब जाण्यास भाग पाडत होते.

हेही वाचा- ‘काळ्या जादू’द्वारे प्रेम मिळवून देतो सांगत अविवाहितांची लाखो रुपयांची फसवणूक; प्रेमासंबंधित मंत्रांचेही ठरलेले दर

एल तेहरानी असं या पीडित १७ वर्षीय मुलीचे नाव असून ती इराणची नागरिक आहे. व्हिडीओत ही मुलगी चेहऱ्यावर टिश्यूने काहीतरी पुसताना दिसत आहे. तर पुरुषांचा जमाव तिच्यावर ओरडत तिला मारहाण करताना दिसत आहे. एका व्यक्तीने लाथ मारल्यानंतर मुलगी कारला धडकल्याच दिसत आहे. अशातच काही दुचाकीस्वार येऊन मुलीला घेराव घालतात आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील पीडित मुलगी तिचा साथीदार ए खानाकबरोबर या ठीकाणी आली होती. जमाव तिला मारहाण करायला लागल्यावर ए खानाक तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, जमावाकडून त्यालाही मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे जमावात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने तरुणीच्या मित्रावर चाकूने हल्लाही केला. याप्रकरणी सुलेमानिया पोलिसांनी १६ जणांना अटक केली असून या आरोपींकडून चाकू आणि तलवारी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर कुर्दिस्तानच्या एका मीडिया साइटने माहिती दिली होती की, ३० डिसेंबर रोजी पुरुषांनी बाईकच्या या कार्यक्रमापासून महिलांना दूर ठेवण्याची मागणी केली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 17:34 IST

संबंधित बातम्या