बऱ्याचदा असे म्हटले जाते की लोक तंत्र-मंत्राच्या किंवा तांत्रिकांच्या वर्तुळात पडल्यावर त्यांना खूप अडचणीत येतात. गुजरातच्या अहमदाबादमध्येही असेच काहीसे घडले आहे. तेथील एका मोठ्या व्यावसायिकाला तांत्रिकाने ४३ लाखांची फसवणूक केली आहे. अहमदाबादमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान चालवणाऱ्या अजय पटेलच्या गर्लफ्रेंडने त्यांच्याशी बोलणे बंद केले. मकरबा भागात आपले दुकान चालवणारे अजय पटेल यांना या गोष्टीची खूप काळजी होती आणि त्यांना कोणत्याही परस्थितीमध्ये गर्लफ्रेंडला परत मिळवायचे होते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अजय पटेल एका तांत्रिकला भेटले.

एका मंत्रासाठी ४३ लाख

एका कॉमन मित्राद्वारे अनिल जोशी नावाच्या एका तांत्रिकशी त्याची ओळख झाली. या तांत्रिकाने अजय पटेलला वचन दिले होते की तो तंत्र-मंत्राद्वारे आपल्या मैत्रिणीला त्याच्या आयुष्यात परत आणेल. यानंतर तांत्रिकाने वेगवेगळ्या तंत्र विद्याच्या नावाने पैसे घेतले. अजय पटेल यांच्या मते, त्यांनी मे २०२० मध्ये प्रथम ११,४०० रुपये दिले. त्यानंतर, आतापर्यंत, विविध प्रसंगी तांत्रिकला अजय पटेल यांच्याकडून एकूण ४३ लाख रुपये दिले गेले आहेत.

मंत्र काम करेना

तांत्रिकला पैसे दिल्यानंतर अजय पटेलचा प्रश्न सुटला नाही. यानंतर अजय पटेल यांनी सरखेज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. माध्यमांशी बोलताना अजय पटेल म्हणाले की, “मी सर्व पुराव्यांसह सरखेज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात ४०० हून अधिक ऑडिओ रेकॉर्डिंग देखील आहेत. मी पैसे हस्तांतरणाचे सर्व पुरावे देखील दिले आहेत.”असे सांगितले जात आहे की तांत्रिकची पत्नी गुरु धर्माजी देखील फसवणूकीत सामील आहे.

तक्रार करताना अडचणी

मात्र, पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही अजय पटेल यांनी केला. पोलिसांनी त्यांना मदत केली नाही असं त्याचं म्हणणे आहे. सर्व पुरावे दिल्यानंतरही पोलीस एफआयआर नोंदवत नसल्याचा आरोप आहे. असे सांगितले जात आहे की, सरखेज पोलिसांनी प्रथम या प्रकरणाचा तपास केला आणि नंतर हे प्रकरण घाटलोडिया पोलीस ठाण्यात हस्तांतरित केले. पीडितेचे वकील कुलदीप जडेजा म्हणाले की, “आम्ही या प्रकरणी न्यायासाठी पोलीस आयुक्तांकडे जाऊ.”