भारतात लोक लग्नात खूप पैसा खर्च करतात. आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन लग्नात खर्च करतात. गरिबातील गरीब लोकही आपल्या घरचे लग्न थाटामाटात करतात. भारतात सध्या लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान, श्रीमंत लोक आपल्या घरात अशा पद्धतीने लग्न करतात, ज्याची चर्चा वर्षानुवर्षे होते. सध्या सोशल मीडियावर गुजराती व्यावसायिकाच्या मुलाच्या लग्नाची चर्चा आहे. गुजराती व्यापारी मुलेशभाई उकनी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात ४ किलोची लग्नपत्रिका छापली आहे.

कशी आहे लग्नपत्रिका?

फिकट गुलाबी रंगाची ही लग्नपत्रिका दिसायला खूप सुंदर आहे. बॉक्ससारखी ही लग्नपत्रिका दिसते. उघडल्यावर आतमध्ये मलमलच्या कापडाच्या चार लहान पेट्या आहेत. या पेट्यांमध्ये सुका मेवा ठेवण्यात आला आहे. या कार्डचे एकूण वजन चार किलो २८० ग्रॅम आहे. एका लग्नपत्रिकाची किंमत ७ हजार सांगितली जात आहे. कार्डमध्येही एकूण ७ पाने आहेत. यामध्ये तीन दिवसीय विवाह कार्यक्रमाचा तपशील लिहिला आहे. काजू, बेदाणे, बदाम, चॉकलेट्स लग्नपत्रिकाचे पेटी दिली आहे. १४ नोव्हेंबरपासून राजस्थानच्या जोधपूरमध्ये लग्नसोहळा सुरू होणार आहे.

(हे ही वाचा: करीना कपूरच्या दुपट्टा मेरा गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल! )

सर्व प्रथम, द्वारकाधीशच्या कृष्णाचे चित्र लग्नपत्रिकेमध्ये दिसते. मुळेशभाई उकनी आणि त्यांच्या कुटुंबीयांची कान्हाजीवर खूप श्रद्धा आहे. यामुळे त्यांनी लग्नपत्रिकेमध्ये त्यांचे चित्र छापले आहे. लग्नपत्रिकाच इतकी भव्य असताना लग्नसोहळा किती भव्य असेल याची उत्सुकता लोकांना आहे. मुलेशभाई उकनी हे द्वारका मंदिराचे विश्वस्त देखील आहेत. हे लग्न अंबानी कुटुंबाइतकेच भव्यदिव्य असेल अशी लोकांची अपेक्षा आहे.