Destination Wedding : लग्न प्रत्येकासाठी आयुष्यातील खास क्षण असतो. आपले लग्न खास आणि स्मरणीय व्हावे यासाठी काही नाही काही हटके कल्पना शोधत असतात. एका जोडप्याची लग्न करण्यासाठीची भन्नाट कल्पना सध्या चर्चेत आली आहे. गुजरातमधील एका जोडप्याने डेस्टिनेशन वेडिंगसाठी हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीतील बर्फाच्छादित पर्वत निवडला आहे. या ठिकाणी हाडे गोठवणारी थंडी असते जोडप्याने मुरंग, स्पिती येथे त्यांचा लग्नाचा मंडप उभारला. या प्रदेशातील पहिलाच लग्न मंडप असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडीओमध्ये हाडे गोठवणारी थंडीत, बर्फाच्छित प्रदेशामध्ये लग्न करताना एक जोडपे दिसत आहे. नवरीच्या इच्छेसाठी चक्क बर्फामध्ये लग्न करण्याचा निर्णय या जोडप्याने घेतला आहे. गुजरातमधील या जोडप्याने उणे २५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये पार पडले आहे. चक्क बर्फामध्ये मंडप उभारून जोडप्याने सात फेरे घेतले आहे. असा लग्नसोहळा तुम्ही कधी पाहिला नसेल. दरम्यान या लग्न सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

BJP Maharashtra To Be Washed Out NDA TO Loose In More Than 10 States
महाराष्ट्रासह ‘या’ १० राज्यांत भाजपाचा धुव्वा उडवणार इंडिया आघाडी? सर्वेक्षणातील माहितीत ‘ही’ मोठी चूक
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
72 meter tall flyover viral video
Fact check : गुजरातमध्ये बांधलाय ७२ मीटर उंचीचा ब्रिज? Viral होणारा व्हिडीओ नेमका कुठला?
Fans Clashed in the Stadium Video
राजस्थान आणि दिल्लीचा सामना पाहण्यासाठी आलेले चाहते एकमेकांना भिडले, स्टेडियममधील मारामारीचा VIDEO व्हायरल

हेही वाचा – “तुम्ही जितके निर्लज्ज व्हाल तितका तुमचा पगार वाढेल”, ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देत आहे निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण

हिमाचल प्रदेश सरकारमधील सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अजय बन्याल यांनी शेअर केलेला व्हिडिओ, लग्नाच्या वेळीचा खास क्षण दिसत आहे., नववधूच्या पोशाखात फुलांनी सजवलेल्या कारमध्ये नवरी उभे राहिलेली दिसत आहे. मंडपामध्ये नवरा नवरी एकमेकांना वचन देताना दिसत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोहळा गोठवणाऱ्या तापमानमध्ये पार पडत आहे . बर्फाच्छादित पर्वरांगाच्या मधोमध पवित्र नात्याचा सुंदर सोहळा पार पडत आहे.

व्हिडिओमधील आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे या जोडप्याने हलक्या हिमवर्षावात पारंपारिक पद्धतीने लग्न करत आहेत. हे दृश्य एखाद्या चित्रपटातीस वाटून शकते. थंडीचा सामना करण्यासाठी त्यांनी हातमोजे घातले आहेत. नवविवाहित जोडप्याला “लॉन्गेस्ट रोड ट्रिप वेडिंग एक्स्पिडिशन फॉलोइंग”(Longest Road Trip Wedding Expedition) साठी पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा – धक्कादायक! व्यक्तीच्या फुफ्फुसातून बाहेर काढले चक्क झुरळ, केरळच्या डॉक्टरांनी केली ८ तासांची वैद्यकीय प्रक्रिया

हेही वाचा – नासाने शेअर केला अंतराळातून काढलेला पृथ्वीचा आश्चर्यकारक फोटो, पाहा बर्फाने झाकलेला हिमालय अन्…

स्पिती व्हॅलीतील हे अनोखे लग्न केवळ डेस्टिनेशन वेडिंगसाठी एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे. त्याचबरोबर हिमालयातील हिवाळ्यामधील कडाक्याच्या थंडीतही कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यासाठी प्रेमाच्या सामर्थ्याची एक सुंदर आठवण तयार केली आहे.