गुजरात निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीबरोबरच प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेस आणि आम आदमी पार्टीकडूनही जोरदार प्रचार सुरु आहे. सभा, रॅली, घोषणाबाजी, दौरे या साऱ्या गोष्टींदरम्यान सोमवारी येथील मेहसाणामध्ये काँग्रेसच्या सभेत चक्क एक वळू घुसल्याचा प्रकार घडला. या प्रकारासाठी काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपाला दोषी ठरवत जाणूनबुजून हा प्रकार करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशोक गेहलोत हे महसाणा येथे निवडणुकीनिमित्त प्रचारसभेला संबोधित करत होते. गेहलोत यांचं भाषण सुरु असतानाच अचानक सभेच्या ठिकाणी एक वळू घुसला आणि एकच गोंधळ उडाला. सभेसाठी आलेले समर्थक खास करुन महिलांची चांगलीच धावपळ झाल्याचं दिसून आलं. अनेकांनी खुर्चा उचलून या वळूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. हा वळू सैरभैर पळू लागल्याने एकच गोंधळ उडाला आणि श्रोते इकडे तिकडे पळत या वळूसमोर आपण येणार नाही याची खबरदारी घेत होते. या वळूने बांबूंचं कुंपण तोडून सभेच्या ठिकाणी येणाऱ्या कार्पेट टाकलेल्या मूळ मार्गेकेवरही गोंधळ घातला.

हा संपूर्ण प्रकार पाहून भाषण देणार गेहलोत काही काळ थांबले. पुन्हा भाषण सुरु केलं तेव्हा त्यांनी या घडलेल्या प्रकारामागे भाजपा असल्याचा उल्लेख केला. “अशा गायी आणि बैल मी लहानपणापासून पाहतोय. जेव्हा काँग्रेसची मीटिंग किंवा सभा असते तेव्हा भाजपावाले अशाप्रकारे गायी, बैल पाठवतात सभेमध्ये अडथळा आणण्यासाठी. त्यामुळे ही माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नाही,” असं गेहलोत यांनी म्हटलं.

काही वेळानंतर हा वळू सभास्थळापासून दूर गेला. मात्र सभेनंतरही या प्रकराची स्थानिकांमध्ये चांगलीच चर्चा दिसून आली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujrat election bull enter ashok gehlot rally scsg
First published on: 29-11-2022 at 11:33 IST