Gujrat Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. त्यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते; तर काही व्हिडीओंमुळे आपला थरकाप उडतो. आतापर्यंत आपण थरकाप उडविणारे असे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय; समाजमाध्यमांवर प्राण्यांचे असे व्हिडीओ पाहण्यासाठी युजर्सदेखील मोठ्या प्रमाणात पसंती देतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गुजरातमधील वडोदरा येथे मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विश्वामित्री नदीच्या पुराच्या पाण्यातून मगरींनीदेखील मानवी वस्तीमध्ये शिरकाव केल्याचे दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जे पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?
हा व्हायरल व्हिडीओ गुजरात येथील वडोदरामधील असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भलीमोठी १४ फुटांची मगर विश्वामित्री नदीच्या पुराच्या पाण्यातून रस्त्यावर आलेली दिसत आहे. यावेळी ती मगर पाण्यातून मानवी वस्तीमध्ये मुक्त संचार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत व्हिडीओतील कॅप्शनमध्ये, “वडोदरा पुरासह आता मगरीचीही भीती निर्माण झाली आहे. प्रत्येक वेळी विश्वामित्री नदीला पूर येतो तेव्हा मगरी पाण्यासह मानवी वस्तीमध्ये शिरकाव करतात”, असं लिहिण्यात आलं आहे.
या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @Gopi Maniar ghanghar या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या वडोदरा येथे विश्वामित्री नदीतून मगरी बाहेर येण्याच्या १५ घटना घडल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “मगरींचा मुक्त संचार होणं स्वाभाविक गोष्ट आहे, जिथे पाणी असते. तिथे त्या जातात.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, “बापरे खूप भयानक.” तिसऱ्या युजरने लिहिलंय, “एवढी मोठी मगर आली तरी कुठून?” चौथ्या युजरने लिहिलेय, “आमच्यासाठी ही गोष्ट नवीन नाही.”
दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यापैकी एका व्हिडीओत एक मगर चक्क मानवी वस्तीत आलेली दिसली होती. आणखी एका व्हिडीओमध्ये मगरीने मोठ्या चतुराईने हरणाची शिकार केली होती.