Viral Video Teacher Sweet Response To Students : २० ते ३० जणांना एकटं सांभाळणे, मस्तीखोर मुलं असली तरीही संयमाने परिस्थिती हाताळणे, विद्यार्थ्यांना परीक्षेत पास होण्यासाठी योग्यरीत्या तयार करणे असा प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला गुरू म्हणजेच शिक्षक असतो. शिक्षक एक उत्तम व्यक्ती घडवण्याचं काम करत असतो. त्यामुळे सध्याचा काळ जरी बदलला असला, तरीही शिक्षकाची जागा कुठलंही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही हेही तितकंच खरं आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त आपण शाळेतील गुरूंना म्हणजे शिक्षिका व शिक्षक यांना गुलाबाचे फुल किंवा पेन देतो. शिक्षिका तर ही फुले केसात माळू शकतात. पण, शिक्षक या फुलांचे काय करणार असाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. कारण – काही दिवसांनी ही फुले अगदी कोमेजून जातात आणि मग कचराकुंडीत फेकावी लागतात. पण, व्हायरल व्हिडीओतील शिक्षकाने या गुलाबांसाठी अगदी जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे. हा जुगाड काय आहे व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
शिक्षकांच्या टेबलवर गुरुपौर्णिमेनिमित्ताने दिलेली फुले पाहून ‘भेट मिळालेल्या एवढ्या फुलांचं तुम्ही काय करणार सर? असा प्रश्नही विद्यार्थिनींनी शिक्षकांना विचारला. त्यावर उत्तर देण्यासाठी त्यांनी सगळ्या विद्यार्थीनींना पुढे बोलावले आणि प्रत्येकीच्या केसात टेबलावर ठेवलेले एकेक गुलाब घातले. यामुळे विद्यार्थीनीही खुश झाल्या आणि सगळ्यांनी दिलेल्या फुलांचेही नुकसान झाले नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षक व विद्यार्थिनींचा खास व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा निक्की बघा…
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या @mayur_sir2137_pri.education इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘गुरुपौर्णिमेनिमित्ताने भेट मिळालेल्या एवढ्या जास्त फुलांचं सर तुम्ही काय करणार… असं प्रश्न मुलींनी विचारला” अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “असे शिक्षक प्रत्येक वर्गाला लाभो खूप छान शिकवणं दिलीत”, “मी पण असचं केलं, मुली खूप खुश झाल्या”, “खूप छान सर”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
