Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नाच्या वेळी अनेकदा नवरी नवऱ्याचे नाव घेत उखाणा सांगते पण या स्पर्धेत आता पुरुष मंडळीसुद्धा उतरले आहेत. लग्नात नवरदेवसुद्धा सुद्धा बायकोचे नाव घेतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाला बायकोचं नाव घेण्यास सांगितले जाते पण त्याला उखाणा घेता येत नाही तेव्हा भटजी त्याच्या मदतीला धावतात आणि उखाणा सांगतात. भटजीचा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील असून नवरदेव आणि नवरी एकमेकांसमोर बसलेले दिसत आहे. नवरदेवाला उखाणा घेण्यासाठी आग्रह केला जातो पण त्याला उखाणा घेता येत नाही तेव्हा त्याच्या बाजूला बसलेले भटजी त्याला मदत करतात आणि उखाणा कसा घ्यायचा, ते सांगतात
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की भटजी चक्क उखाणा सांगतात. ते म्हणतात, “आंब्याचा केला आमरस, लिंबाचं केलं सरबत… आंब्याचा केला आमरस, लिंबाचं केलं सरबत… तिचं नाव घ्यायचं, तिच्यावाचून आता एक मिनिटही नाही करमत..” भटजीचा हा उखाणा ऐकून नवरदेवाच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि कार्यक्रमात आलेले पाहुणे सुद्धा जोरजोराने हसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

हेही वाचा : नाद खुळा! आजीबाईने केला भन्नाट डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “वयाची पर्वा न करता आयुष्याचा असा आनंद घ्यावा”

storiesby_9 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “नवरदेवच्या कानात सांगा उखाणा मग तो म्हणेल” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “गुरूजी लय भारी” आणखी एका युजरने लिहिलेय, “असे भटजी प्रत्येकाच्या लग्नात असो”

Story img Loader