रेल्वेस्थानकावर किंवा ट्रेनमध्ये वस्तू विक्रेत्यांच्या मनमानीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेल्वेस्थानकावरील एक विक्रेता ग्राहकाकडे एका वस्तूच्या किंमतीपेक्षा अधिक पैशांची मागणी करत होता. यावेळी त्याला कारण विचारले असता त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली.

रेल्वेस्थानकावर विक्रेत्याची गुंडगिरी

ही घटना गुवाहाटी रेल्वेस्थानकावरील आहे, इथे प्लॅटफॉर्मवरील दुकानातून एक व्यक्ती केक घेण्यासाठी आला होता. पण, विक्रेत्याने त्याच्याकडे आणखी पैशांची मागणी सुरू केली. त्याला याचे कारण विचारले असता तो संतापला आणि गैरवर्तन करू लागला, त्या व्यक्तीने त्याच्या सर्व कृती आणि उत्तरांचे व्हिडीओ रेकॉर्ड केले आहेत.

Viral VIDEO: Man Slaps & Kicks Thief Caught Stealing Purse Inside Delhi Metro
VIDEO: “मी मरेन काका, मला जाऊ द्या” दिल्ली मेट्रोमध्ये चोराला रंगेहात पकडलं; त्यानंतर काय घडलं पाहाच
Mumbai vande bharat express marathi news
मुंबई: जोरदार पावसाने वंदे भारत एक्स्प्रेस रद्द, रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले
Traffic, Kalyan West railway station,
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील वाहन कोंडीने प्रवासी हैराण
Vande Bharat Express train
वंदे भारत ट्रेनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती, प्रवाशांनी VIDEO शेअर करताच रेल्वेने दिलं उत्तर, “अडथळा आल्याने..”
cctv camera, Thane station,
ठाणे स्थानकातील ३४ कॅमेरे बंद, निगराणी नसल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Mumbai Video: Car Catches Fire On Gokhale Bridge In Andheri East
मुंबईत अंधेरीच्या गोखले पुलावर कारला भीषण आग, वाहनांच्या रांगा; प्रवाशांनो थरारक VIDEO पाहाच
Horrific VIDEO: Miscreants Drag Youth By Collar Alongside Moving Train At Bhopal Railway Station
प्लॅटफॉर्मवर उभ्या प्रवाशाची चालत्या ट्रेनमधून कॉलर पकडली; फरफटत नेलं अन्…रेल्वे स्टेशनवरचा थरारक VIDEO व्हायरल
Central Railway, CSMT Local,
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांचे हाल; सीएसएमटी लोकलची धाव परळ, कुर्ल्यापर्यंत

व्हिडीओमध्ये विक्रेता त्या व्यक्तीला धमकावत सामान परत करण्यास सांगत आहे. तुम्ही इतके पैसे का घेत आहात असा प्रश्न त्या व्यक्तीने विचारला असता, विक्रेत्याने त्याला तेथून निघून जाण्यास सांगून धमकावण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ @avi_nash7086 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यावर त्याने सांगितले की, विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली असून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. एवढेच नाही तर एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. विक्रेता मूळ किमतीपेक्षा दहा रुपये जास्त मागत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा काय प्रकार? ‘वंदे भारत’ची अवस्था पॅसेंजर ट्रेनपेक्षाही वाईट; VIDEO पाहून युजर म्हणाला, “देशात श्रीमंतांसाठी…”

या व्हिडीओवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, भाऊ, तुम्ही अगदी बरोबर केले आहे; अशा विक्रेत्यांची मनमानी खूप वाढली आहे, ते ग्राहकांशी चांगले वागत नाहीत. आणखी एका युजरने लिहिले की, असे विक्रेते काहीवेळा प्रवाशांवर हल्ला करतात. अशा लोकांशी वाद घालताना काळजी घेतली पाहिजे. आणखी एका युजरने लिहिले की, अनेक रेल्वेस्थानके आणि बस स्टँडवर असे घडते. आपण त्या विरोधात उभे राहिलो तरी अनेकदा कारवाई होत नाही.