VIDEO : एका हातात बिअर, दुसऱ्या हातात झेल; ‘क्राउड कॅच हिरो’ची कमाल

तरुणाचा हा झेल व्हायरल

catching, cricket ball,beer, watch video,marathi news
एका हातात बियरचा ग्लास आणि दुसऱ्या हाताने सुंदर कॅच

क्रिकेटच्या मैदानामध्ये रंगलेल्या सामन्यात अनेकदा अप्रतिम झेल पाहायला मिळतात. काही झेल इतके सुरेख असतात की, सामन्यात मोठी खेळी करणारा फलंदाज किंवा सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजापेक्षाही अप्रतिम झेलमुळे क्षेत्ररक्षकाचे अधिक कौतुक होते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका सुंदर आणि अप्रतिम झेलची चर्चा सुरु आहे. आता झेल म्हटले की, तो क्रिकेटच्या मैदानातील असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण हा झेल खेळाडूने नाही तर सामना पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणाने प्रेक्षक गॅलरीत टिपला आहे. विशेष म्हणजे एका हातात बिअरचा ग्लास आणि दुसऱ्या हाताने सुंदर कॅच यामुळे या झेलची चांगलीच चर्चा रंगताना दिसते.

इंग्लंडमध्ये सध्या नेटवेस्ट टी-२० ब्लास्टची जोरदार चर्चा आहे. या स्पर्धेतील सामन्यावेळी एका तरुणाने हा अप्रतिम झेल टिपलाय. हे दृश्य इतकं सुंदर होतं की उपस्थित प्रेक्षकांनी त्याला दाद दिलीच, पण समालोचकांनी या झेलचं कौतुक केल.

या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. क्राउड कॅच हिरो तुला सलाम! असे ट्विट करुन हा व्हिडिओ नेटवेस्ट टी-२० ब्लास्टच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Guy catching cricket ball from the crowd with a beer in his hand watch video

ताज्या बातम्या