सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. सध्या असाच एक आपणाला भावूक करणारा आणि आई-मुलाच्या नात्यातील निस्वार्थ प्रेम दाखवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही व्हिडीओतील आईसह मुलाचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील डीएसपी संतोष पटेल यांचा आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी डीएसपीचे खूप कौतुक करत आहेत. डीएसपी झाल्यानंतर संतोष पटेल पहिल्यांदाच आईला भेटण्यासाठी गावी आले आणि त्यांनी आपल्या आईला सरप्राईज दिलं. शिवाय आपल्या मुलाला थेट शेताच्या बांधावर आल्यालं पाहून आईलादेखील खूप कौतुक वाटत आहे, याचवेळी आई-मुलामध्ये झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
Failed Robbery Attempt
माय-लेकींच्या धाडसाला सलाम! दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरांशी भिडल्या; व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून आरोपींना अटक
Textile Mill Workers, Transit Camps, Hazardous Building, Issue Persists, shivadi, byculla, lalbaug, parel,
संक्रमण शिबिरांना कंटाळलेल्या गिरणी कामगारांची सुटका कधी ? चाळी मोडकळीस, पुनर्विकास रखडलेला

हेही पाहा- ‘डावी किडनी विकणे आहे…’ डिपॉजिटसाठी पैसे नाहीत म्हणून पठ्ठ्याने किडनी काढली विकायला; पोस्टर Viral

डीएसपी झाल्यानंतर संतोष पटेल पहिल्यांदाच आईला भेटण्यासाठी गावात पोहोचला तेव्हा ती शेतात गवत कापत होती. आपल्या मुलाला पोलिसाच्या वर्दीत पाहून आईला खूप आनंद झाल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. शिवाय यावेळी ते दोघ आपल्या गावच्या भाषेत बोलताना दिसत आहेत. डीएसपी मुलगा आपल्या आईला विचारले की, ती हे सर्व का करत आहे आणि कशाची कमतरता आहे.

यावर त्याच आई अगदी साध्या शब्दात म्हणाली की, “आईची ममता वेगळी असते, आईसाठी तिचं मुल कोणीही बनलं तरीही तिला आपल्या मुलांसाठी काहीतरी करावं असं वाटत असते.” यावेळी DSP मुलगा आपली शेती किती आहे? तु या शेतीच्या कामातून किती पैसे कमवतेस? असे काही प्रश्न विचारताना दिसत आहे.

हेही पाहा- सरकारी कार्यालयात हेल्मेट घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा Video Viral; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दरम्यान, तु अजूनही शेती करतेस तर मग नोकरी चांगली का शेती असं विचारलं असता आई मात्र नोकरीच चांगली असं म्हणतानाही व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, आपल्या मुलाला पोलिसाच्या गणवेशात पाहून आई म्हणते की, “आता गरिबीचा तुझा चेहरा काळा झाला आहे, कारण माझा मुलगा पोलीस बनला आहे.” याचवेळी डीएसपी संतोष पटेल यांनी आपल्या आईला आता गावात न राहता ग्वाल्हेरला राहायला जाऊया असंही म्हटलं आहे.