Shocking news: देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे आजच्या तरुण पिढीतील बरेचजण नैराश्यात जावून स्वत:ला संपवून घेण्याचा टोकाचा निर्णय घेताना दिसत आहेत. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी हे हिताचं नाही. याशिवाय या तरुणांच्या कुटुंबियांसाठी देखील ते योग्य नाही. त्यामुळे आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाचं कसं होईल? याचाही विचार तरुणांनी करायला हवा. पण आत्महत्या करणाऱ्यांमध्ये फक्त तरुणच नाही तर अल्पवयीन मुलामुलींची संख्या देखील मोठी आहे. अशातच आणखी एक हादरवून टाकणारं प्रकरण समोर आलं आहे.

“सॉरी मम्मी, मी एक चांगली मुलगी नाही… मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला साडू नको.” आपल्या आईला शेवटचा मॅसेज पाठवून एका जिम ट्रेनरने गळफास लावून आत्महत्या केली. या तरुणीने घरीच गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी या तरुणींने एक व्हिडीओ तयार केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या मृ्यूच कारण सांगितलं आहे. तसेच आईला मॅसेज करुन सर्व प्रकार उघडकीस आणला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

आई तू त्याला सोडू नकोस.

शनिवारी संध्याकाळी जालौन जिल्ह्यात २१ वर्षीय जिम ट्रेनरने तिच्या प्रियकराशी झालेल्या मतभेदामुळे आत्महत्या केली. घटनेपूर्वी, तिने तिचा व्हिडीओ तिच्या आईच्या मोबाईल फोनवर पाठवला आणि तिच्या प्रियकराने तिची कशी फसवणूक केली याचा संदेश पाठवला. शनिवारी तरुणीने खुर्चीवर उभी असताना तिच्या गळ्यात फास घातला आणि त्यानंतर आत्महत्या करण्याआधी एक व्हिडीओ तिच्या आईला पाठवला. तिने सोबतच एक मेसेजही पाठवला. हा मेसेज वाचून तुम्हालाही धक्का बसेल. मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी आईला एक मॅसेज पाठवला. ज्यामध्ये लिहिलं होतं की, मम्मी सॉरी मी एक चांगली मुलगी नाही. मी चूक केली आहे. मी चुकीच्या व्यक्तीच्या (हिमांशु यादव) प्रेमात पडले. मी आता जात आहे. तू तुझी काळजी घे. आय रियली लव हिम… पण आई तू त्याला सोडू नकोस. असं सांगितलं जातं की, मुलगी आपल्या बॉयफ्रेंडमुळे हैराण झाली होती.

पाहा फोटो

हेही वाचा >> VIDEO: काय गरज होती का? एसी लोकलचे दरवाजे बंद होताना वृद्ध व्यक्तीनं चढण्याचा प्रयत्न केला अन्…शेवटी काय घडलं पाहा

हे संपूर्ण प्रकरण ओराई कोतवाली परिसरातील मोहल्ला गणेशगंजचे आहे. जिथे शनिवारी रात्री उशिरा मुलीने गळफास लावून घेतला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. कुटुंबीयांच्या आरोपानुसार पोलीस कारवाई करत आहेत. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी मुलीचा फोन जप्त केला आहे. ती बॅचलरची विद्यार्थिनी होती आणि तिच्या घराजवळील जिममध्ये ट्रेनर होती. मुलीचा प्रियकर तिच्यासोबत जिममध्ये काम करायचा.

आर्थिक घटकांसोबत आपल्या मानसिक स्वास्थावरदेखील परिणाम होऊन मानसिक ताण येऊ शकतो. परिणामी डिप्रेशन, मूड स्विंग्स् अशा गोष्टी येणे ही सामान्य बाब मानली जाते. मात्र काहीही असले तरी आपल्या जीवापेक्षा मोठे काहीही नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

Story img Loader