Gym Viral Video : सोशल मीडियावर नेहमी काही ना काही व्हायरल होत असते. एक व्हिडीओ जुना होताच दुसरा व्हिडीओ व्हायरल होतो. त्यात हल्ली जिममधील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यामध्ये तरुण कधी जिममध्ये स्टंटबाजी करतानाही दिसतात. पण, आता जिममधील असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओमध्ये एक तरुणी जिममध्ये वर्कआऊट करून मोबाईलवर टाइमपास करत होती. यावेळी तिच्याबरोबर अशी एक दुर्घटना घडली की, जिचा तिने विचारही केला नसेल. जिममध्ये तरुणीबरोबर घडली धक्कादायक घटना? (Gym Accident Viral Video) व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चेस्ट बटरफ्लाय मशीनवर बसून चेस्ट एक्सरसाइज करीत असल्याचे दिसत आहे. यावेळी तरुणाच्या डाव्या बाजूला एक तरुणी येऊन उभी राहते. जी तिच्या मोबाईलवर काहीतरी बघत उभी असते. काही वेळ व्यायाम केल्यानंतर तरुण थांबतो आणि काही सेकंदांनंतर चेस्ट बटरफ्लाय मशीनचे हॅण्डल सोडतो. तरुणाने मशीनचे हॅण्डल सोडताच ते थेट तरुणीच्या चेहऱ्यावर जाऊन आपटते आणि त्यामुळे ती जोरात खाली कोसळते. यावेळी दुखापतग्रस्त झाल्याने तरुणी ओरडत डोके पकडून बसते. त्यानंतर जिममधील इतर लोक तिथे गोळा होतात. (Gym Viral Video) Read More Trending News : वायनाडमध्ये बघता बघता संपूर्ण बंगला पाण्याखाली; पुराच्या भयानक दृश्याचे cctv फुटेज नेमके कुठले? वाचा… व्हायरल व्हिडीओवर युजर्सच्या कमेंट्स जिममधील हा व्हिडीओ @cctvidiots नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शन लिहिले आहे, 'सेटच्या अर्ध्यातच त्याला जाणवले की, त्याच्या ट्रेनरने त्याला चेस्ट क्रशर नव्हे, तर स्कल क्रशर करायला सांगितले होते.' या व्हिडीओवर युजर्स आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, हत्येचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आणखी एका युजरने लिहिले की, जिममध्ये मोबाईल वापरण्याचे फायदे. तिसऱ्या युजरने लिहिले की, ती फोन का वापरत होती आणि व्यायाम का करीत नव्हती? चौथ्या युजरने लिहिले की, यात दोघांचीही चुकी आहे; पण तो माणूस पूर्ण मूर्ख आहे. तर शेवटी एका युजरने लिहिले की, तिला खूप जोरात लागले असेल.