सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. या व्यासपीठावर अनेक कलाकार आपली कलाकृती सादर करत असतात. अद्भुत कलाकारीला नेटकऱ्यांकडूनही दाद मिळते. त्यामुळे कलाकार आपली कला सादर करण्यासाठी सोशल मीडिया हे व्यासपीठ निवडतात. असाच एक कलाकार सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या व्यक्तीने काचेवर कलाकृती तयार केल्याचा व्हिडीओ आहे. रंग किंवा ब्रशने कलाकृती करण्याऐवजी हा व्यक्ती हातोडीचा वापर करताना दिसत आहे.

काचेवर हातोडीचा प्रहार केल्यावर काच तुटते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या कृतीतून एखादी व्यक्ती चित्र तयार करेल याचा आपण विचारही केला नसेल. मात्र robtheoriginal या इन्स्टाग्राम पेजवर एका व्यक्तीने अशा कृतीतून अनेक चित्र तयार केल्याचं समोर आलं आहे. कलाकार वारंवार हातोडीने काचेवर प्रहार करून तड्यांपासून चित्र तयार करताना दिसत आहे. त्याने शेअर केलेले व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
Couple Romance On Running Bike Viral Video Internet is Angry Since Police Arrested Only Boyfriend Calling It Shameless that Girl Ran Away
Video: धावत्या बाईकवर बेभान जोडप्याचा रोमान्स; कारवाईनंतर पोलिसांवरच लोकांचा संताप म्हणाले, “यांना मुलं..”
police women struggles to meet her baby child for just 2 minute
VIDEO : शेवटी आईचं काळीज! फक्त २ मिनिटे लेकीला भेटण्यासाठी हिरकणीची धडपड; पोलीस कर्मचारीचा व्हिडीओ व्हायरल
Mohammed Shami's social media post after surgery
Mohammed Shami : ‘बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी…’, शस्त्रक्रियेनंतर शमीने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स केल्या असून एका युजर्सने लिहीलं आहे की, “किती छान कला आहे, असंही चित्र काढू शकतं याचा कधी विचारही केला नव्हता.” तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, “खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आमच्या घरच्या काही काचांना चेंडू लागल्याने तडे गेलेत. आता वाटतंय तिथे असं चित्र काढावं.”