सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. या व्यासपीठावर अनेक कलाकार आपली कलाकृती सादर करत असतात. अद्भुत कलाकारीला नेटकऱ्यांकडूनही दाद मिळते. त्यामुळे कलाकार आपली कला सादर करण्यासाठी सोशल मीडिया हे व्यासपीठ निवडतात. असाच एक कलाकार सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या व्यक्तीने काचेवर कलाकृती तयार केल्याचा व्हिडीओ आहे. रंग किंवा ब्रशने कलाकृती करण्याऐवजी हा व्यक्ती हातोडीचा वापर करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काचेवर हातोडीचा प्रहार केल्यावर काच तुटते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या कृतीतून एखादी व्यक्ती चित्र तयार करेल याचा आपण विचारही केला नसेल. मात्र robtheoriginal या इन्स्टाग्राम पेजवर एका व्यक्तीने अशा कृतीतून अनेक चित्र तयार केल्याचं समोर आलं आहे. कलाकार वारंवार हातोडीने काचेवर प्रहार करून तड्यांपासून चित्र तयार करताना दिसत आहे. त्याने शेअर केलेले व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hammering on glass and made portrait video viral on social media rmt
First published on: 25-01-2022 at 08:38 IST