सोशल मीडियाच्या जमान्यात आता कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. प्रत्येक गोष्टी कधी ना कधी व्हायरल होत असते. सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडीओ आता उपलब्ध होतात. तुम्हाला कोणत्याही विषयावरील व्हिडीओ पाहायचा असेल, त्या नावाने फक्त तो सर्च करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ढिगाने व्हिडीओ पाहायला मिळतील. फेसबुक पासून इन्स्टाग्राम आणि ट्वीटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तर व्हायरल व्हिडीओचा खजाना मानलं जातं. इथे व्हायरल होणारे व्हिडीओ कधी मनोरंजनाचं साधन ठरतं तर कधी तेच व्हिडीओ तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही भावनिक होऊ शकता, सोबतच या व्हिडीओमधल्या आजोबांच्या इच्छशक्तीचं कौतुकही कराल.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका दिव्यांग आजोबांचा आहे. या आजोबांना एक पाय नाही, तरीही ते आपल्या काठीच्या आधारे फक्त चालतच नाही तर ते ‘पळतात’ही! या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की या आजोबांचा एक पाय नाही. तरीही ते एका कुबड्याच्या मदतीने वेगाने आपली सायकल चालवत आहे. ही त्या आजोबांची इच्छाशक्ती आहे की त्यांनी आपल्या आयुष्यात हार मानली नाही. त्यांची हीच इच्छाशक्ती अनेकांना या व्हिडीओच्या माध्यमातून प्रेरणादायी ठरत आहे.

आणखी वाचा : ऐकावं ते नवलंच! आजोबांनी बांधलं कुत्र्याचं अनोखं मंदिर, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

व्हिडीओमध्ये दिसणारा हा दिव्यांग व्यक्ती कोण आहे, कुठे आहे, त्याबाबत काही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, मात्र, हा व्हिडीओ आयपीएस दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसंच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “कोई और हैं, जो भाग्य को कोसते हैं, हम श्रमवीर हैं, हौसलों से अपना भाग्य लिखते हैं!”

आणखी वाचा : रस्त्यावर फिरताना दिसला कांगारू, हा VIRAL VIDEO पाहून लोक विचारू लागले, ‘भारतात कसा आला?’

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रुग्णवाहिकेच्या मागे तब्बल ५ मैल धावत राहिला घोडा, का ते जाणून घेण्यासाठी हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांच्या धाडसाला सलाम करत असाल. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही वेळातच ७१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला आतापर्यंत ६ हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर, या दिव्यांग आजोबांचे कौतुक करताना लोक या व्हिडीओवर प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

एका यूजरने म्हटलं आहे की, ‘देवही त्याचीच साथ देतो, ज्या व्यक्तीमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असते. तर एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, ‘हे खरं आहे की देव दिव्यांग व्यक्तींमध्ये अनोखे गुण देतो.’