Hanuman Jayanti Wishes 2026 in Marathi: चैत्र पौर्णिमा तिथीला देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह साजरा करण्यात येतो. यंदा चैत्र पौर्णिमा तिथी २ एप्रिल २०२६ ला आहे. यादिवशी देशभरात श्रीराम भक्त हनुमानजीच्या जयंतीचा उत्साह असणार आहे. प्रभू श्रीरामांचे परमभक्त, बलशाली आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे श्रीहनुमान यांचा जन्मोत्सव म्हणजेच हनुमान जयंती. या दिवशी भक्तगण उपवास, पूजा, रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण करून श्रीहनुमानांची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.आजच्या डिजिटल युगात, सणांच्या शुभेच्छा देण्याची पद्धतही बदलली आहे. पूर्वी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या जात असत, पण आता WhatsApp, Instagram, Facebook सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या मित्र-परिवाराला शुभेच्छा देतो. यामुळे तुमचे नातं खूपच महत्त्वाचे आहे. म्हणूनच, हनुमान जयंतीनिमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा, संदेश, कोट्स आणि स्टेटस शेअर करण्याची एक वेगळीच परंपरा तयार झाली आहे. या निमित्ताने आपल्या प्रियजनांना खास मराठीतून भक्तीमय शुभेच्छा द्या.

Hanuman Jayanthi 2026 wishes : भीमरूपी महारुद्रा…! हनुमान जयंतीच्या निमित्त खास शुभेच्छा संदेश!

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती। वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

संपूर्ण ब्रह्मांडात जो आहे बलवान
त्या हनुमंताला आमचा दंडवत प्रणाम
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या कुटुंबावर हनुमानजींची कृपा राहो
सुख शांती समृद्धी तुम्हास लाभो
बल,बुद्धी,विद्या तुम्हाला मिळो
हनुमान जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

“भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो
आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो”
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

“ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

‘भूतप्रेतसमंधादी,
रोगव्याधी समस्तही,
नासती तूटती चिंता,
आनंदे भीमदर्शनें”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

“रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम…
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.

हनुमान जयंती मेसेज, स्टेटस (Hanuman Jayanti Quotes, Message, Status)

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम
हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

मुखी राम नाम जपी,
योगी बलवान लंकेचा नाश करी,
असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा,
कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!