happy chocolate day 2026 : जेव्हा शब्द अपुरे पडतात; तेव्हा आपण भेटवस्तू, पदार्थांचा आधार घेतो. यामध्ये चॉकलेट महत्वाची भूमिका बजावतो. अनेकदा गिफ्ट म्हणून तर कधी कोणाचा राग शांत करण्यासाठी आपण चॉकलेटची मदत घेतो. तर सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. ९ फेब्रुवारी म्हणजे आजचा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला आवडणारे चॉकलेट तुम्ही प्रेम कसे करता, याचे प्रतिबिंब दाखवू शकते. तर त्याचबद्दल या बातमीतून जाणून घेऊयात…
वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटचा थेट लव्ह लँग्वेजशी संबंध असतो. याबद्दल थेट वैज्ञानिक पुरावा नाही. पण, मानसशास्त्रात चॉकलेटच्या प्राकरांचा मूड, भावना आणि व्यक्तिमत्त्व यांच्याशी थोडा संबंध असू शकतो असे सांगण्यात येते.
मिल्क चॉकलेट
जर एखाद्या व्यक्तीची पहिली पसंती मिल्क चॉकलेट असेल, तर ती व्यक्ती प्रेमळ स्वभावाची असण्याची दाट शक्यता आहे. मानसशास्त्राने हे सिद्ध केले आहे की, मिल्क चॉकलेटसारख्या उबदार आणि आरामदायक पदार्थाला तणाव कमी करणाऱ्या गोष्टीशी जोडतात. काही अभ्यास सांगतात की, चॉकलेट मूड सुधारू शकते. लोक ताण-तणाव असताना मिल्क चॉकलेट निवडतात कारण यामुळे भावनिक आधार मिळतो. काही प्रयोगात चॉकलेट खाल्ल्यावर नकारात्मक मूड कमी झाल्याचेही आढळले आहे.
व्हाईट चॉकलेट
व्हाईट चॉकलेट खूप गोड असते. पण, प्रत्येकाला ते आवडतंच असं नाही. जे लोक व्हाईट चॉकलेट खातात, ते बहुतेक वेळा आनंद, मजा आणि स्वतःला व इतरांना खुश करण्यासाठी खातात किंवा भेट म्हणून देतात. व्हाईट चॉकलेटवर जास्त संशोधन नाही. पण, पदार्थ आणि आनंद यावर झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, मन खुश करण्यासाठी, मूड चांगला करण्यासाठी, भावनिक समाधानासाठी निवडण्यासाठी व्हाईट चॉकलेट खाल्ले जाते किंवा भेट म्हणून दिले जाते.

डार्क चॉकलेट
काही लोकांना डार्क चॉकलेट आवडतं. कारण त्यात गोडपणा कमी आणि चव जास्त खोल (strong / rich) असते. अशी मंडळी खाताना विचार करणारी आणि शांतपणे एन्जॉय करणारी असतात. गोड पदार्थ आवडणारे लोक कधी कधी जास्त सहकार्य करणारे, समजूतदार, मदत करणारे असू शकतात. काही अभ्यासात खूप कडू चव आवडणं काही वेळा कठोर किंवा वेगळ्या personality traits शी जोडलेलं असू शकतं. हा फक्त ट्रेंड आहे; त्यामुळे म्हणजे १०० टक्के सगळ्यांवर लागू नाही.
फ्लेवर्ड चॉकलेट्स
कॅरमेल सेंटरपासून ते फळांचा स्वाद असलेल्या फ्लेवर्डपर्यंतची जी मंडळी चॉकलेट्स निवडतात, ते सूक्ष्म फरकांचा आदर करणार असतात. मानसशास्त्राच्या दृष्टीने याचा साधा अर्थ असा होतो की, एखादी व्यक्ती आपले आनंद, दुःख, प्रेम, राग अशा भावना सहज दाखवते, लपवत नाही. म्हणजे व्यक्तीला नवीन गोष्टी करायला आवडतात जसे की, नवीन लोक, ठिकाणे, कल्पना याबद्दल उत्सुक असते. अशी व्यक्ती भावना मोकळेपणाने व्यक्त करते आणि आयुष्यात नवीन अनुभव घ्यायला उत्सुक असते.
चॉकलेट आणि भावना यांच्यात थेट वैज्ञानिक नियम नाही. पण, काही संशोधनात असं दिसलं आहे की, लोक आपली भावना सांभाळण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी काही खास पदार्थ निवडतात. याला इमोशनल इटिंग असे म्हणतात.
उदाहरणार्थ –
- आपण दु:खी असलो तर कम्फर्ट देणारे गोड पदार्थ खायला आवडतात.
- आनंदाच्या किंवा खास प्रसंगी आपण खास पदार्थ निवडतो.
- त्यामुळे पदार्थ हे कधी कधी लोकांमधील जवळीक वाढवायला मदत करतं.
त्यामुळे चॉकलेट तुमचं प्रेम कसं आहे हे ठरवत नाही. तर तुम्हाला नात्यात कोणत्या भावना आवडतात याबद्दल नकळत सांगून जातात.

