ती : सांग ना मिठीतली ‘मी’ पहिली की दुसरी?
तो : अॅ?? हे काय?
ती : अरे पहिली की दुसरी?
(चेहऱ्यावरची भीती आणि गोंधळ त्याला लपवता येत नव्हता.)
ती : अरे लवकर सांग, माझं काम अडलंय
तो : तुला का ते जाणून घ्यायचंय? कोणाचा तरी भूतकाळ उकरून काढण्याची ही वेळ आहे का?
ती : अरे लेख लिहितेय मी, ‘मिठी’ की ‘मीठी’ लिहू? माझा गोंधळ झाला ना. त्यातून मी इंग्लिश मिडियमची आहे! you know ना, माझ्या किती चूका होतात, म्हणून विचारलं मिठीतली मी पहिली की दुसरी .
(आता कुठे बिचाऱ्याला हायसं वाटलं)
तो : मग सरळ ऱ्हस्व की दीर्घ असं विचार ना? पहिली की दुसरी हे काय? हात जोडले बुवा तूझं मराठी ऐकून.
ती : असू दे, जास्त शहाणपणा दाखवू नकोस तू! पण, by the way तू का घाबरलास रे इतका ?
तो : छे! काही काय? मी का घाबरू? हे मात्र उगाच.
ती : उगाच कसं? पाहिलं मी तुझ्या चेहऱ्यावर किती बारा वाजले होते ते.
(आता काय ही बया मला सोडणार नाही, त्याची खात्री पटली.)
तो : ‘तू पहिली’ असं म्हटलं तर विश्वास बसणार नाही, ‘तू दुसरी’ म्हटलं तर ही मला जगू देणार नाही.)
ती : सांग ना तूझ्या मिठीतली मी पहिली की दुसरी?
तो : ‘तू… पहिलीच’
ती : thank you! (काहीशी लाजून)

तो : बापरे, इतक्या लवकर विश्वास बसला?
ती : मग काय! तू मिठी कसा मारतोस यावरून सगळं समजलं मला की तुझ्या मिठीतली बहुदा ‘मी’ पहिलीच असणार.
तो : असं पण असतं का? ‘आयला ये अपूनको मालूमही नही था!’
ती : Hahaha! एक तर तूला नीट hug करता येतच नाही. तूझी हग करण्याची पद्धतच जगावेगळी. समोरून मिठी मारायची नाही, बाजूनं मिठी मारायची, मिठी मारताना अंग आकसून घ्यायचं, नेहमी वितभर अंतर ठेवायचं वगैरे वगैरे. त्यावरुन समजलं मला. i am so smart !
तो : बरं..(काहीसा हसत.) (हिला आता खरं कसं सांगू? उद्या पासून मैत्रिणींना पण, मिठी मारायची बंद होईल ही)
ती : ते जाऊदे पण, खरंच तूला का नाही आवडतं रे hug करायला?
तो : आमच्यात कोण अशा मिठ्या वगैरे मारत नाही.. (काहीसा तुसडेपणानं)
ती : आमच्यात म्हणजे? मिठ्या मारणारे लोक काय परग्रहातून येतात की काय?
तो : नाहीतर काय. आधी समोरच्याला बघून परमानंद झाल्यासारखं किंचाळायचं, मग उड्या मारत उगाच मिठ्या मारत बसायचं. प्रसंग काहीही असो. मग तो आनंद असो की दु:ख उगाच मिठ्या मारायच्या. नको तो खुळचटपणा.
ती : खुळचटपणा काय त्यात? अरे व्यक्त होण्याची पद्धत आहे ती. काही गोष्टी नजरेतून व्यक्त होतात. काही गोष्टी शब्दांतून व्यक्त होतात आणि या दोन्ही गोष्टीतून जे व्यक्त होत नाही ते मिठीतून व्यक्त होतं.
तो : तुम्ही लोक कसलंही ‘लॉजिक’ लावता बुवा.

Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

ती : कसलंही नाही. तथ्य आहे त्यात. मिठी मारणं म्हणजे फाजिल स्पर्श नसतो. काही लोकांना वाटतं मिठी मारणं म्हणजे तिच्या किंवा त्याच्यावर चान्स मारण्याची उत्तम संधी असते. पण मला असं बिलकुल नाही वाटतं. शरीरसुखापलिकडची ही गोष्ट आहे. मी तुझ्यासोबत आहे, ही आश्वासक भावना त्यात आहे. प्रेमाची ऊब त्यात आहे. मायेचा स्पर्श त्यात आहे. आनंद व्यक्त करण्यातलं सुख त्यात आहे आणि आपल्यावर कोणतरी प्रेम करतं याचं समाधानही त्या मिठीत आहे. म्हणूनच नजरेतून आणि शब्दांतून ज्या गोष्टी व्यक्त होऊ शकत नाही त्या भावना व्यक्त होण्याची ताकद त्यात आहे. i hope now you understand.
तो : hmmm!
ती : नुसतं hmmm! करु नकोस. समोरच्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदल, आयुष्य नक्कीच बदलेल.
तो : आजपासून नक्की, (तिला मिठीत घेत.) by the way मिठीतली ‘मि’ पहिलीच आणि अर्थ समजावून सांगणारी तू ही पहिलीच.

-प्रतीक्षा चौकेकर

Pratiksha.choukekar@loksatta.com