हरभजन ट्विटरवरच टीम इंडियाची मस्करी करणाऱ्या पत्रकाराला भिडला, म्हणाला…!

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मो. आमिर आणि भज्जीमध्ये ट्विटर वॉर सुरू होताच, आता त्यात एका पाकिस्तानी पत्रकारानेही भाग घेतला आहे.

harbhajn and iqra nasir
टीम इंडियाची मस्करी करणाऱ्या पत्रकाराला हरभजन उत्तर ( फोटो: @IamIqraNasir,@harbhajan_singh/ Twitter )

तुम्ही हरभजन सिंगला क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा रागवताना पाहिलं असेल. भारत-पाकिस्तान सामना असला की पाजीचा उत्साह कायम असायचा. भारत-पाक टी-२० विश्वचषक सामन्यात भारताचा पराभव झाला. त्यानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वेगवेगळ्या प्रकारची अयोग्य भाषा वापरत आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मो. आमिर आणि भज्जीमध्ये ट्विटर वॉर सुरू होताच, आता त्यात एका पाकिस्तानी पत्रकारानेही भाग घेतला आहे. मग काय भज्जीने पत्रकारालाही सोडले नाही आणि त्याच्या भाषेत उत्तर दिले आहे.

काय आहे नक्की प्रकरण ?

पाकिस्तानी महिला पत्रकार इकरा नसीर यांनी हरभजन सिंग आणि शाहिद आफ्रिदी या वादात उडी घेत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये हरभजन सिंग गोलंदाजी करताना दिसत आहे आणि शाहिद आफ्रिदी फलंदाजी करताना दिसत आहे. आफ्रिदीने चार चेंडूत चार षटकार ठोकले. यानंतर त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हरभजन सिंग तुमच्या आठवी साठी. चार चेंडूत चार षटकार आणि हो कसोटी सामना.”

( हे ही वाचा: गुजरातमध्ये एअरक्राफ्ट रेस्टराँरंट; एअरबस ३२० विकत घेऊन त्यातच उभारलं भन्नाट हॉटेल )

हरभजन सिंगचे प्रत्युत्तर

याला प्रत्युत्तर म्हणून हरभजन सिंगने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये हरभजन सिंग आफ्रिदीच्या चेंडूंवर गगनचुंबी षटकार मारताना दिसत आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये भज्जीमध्ये लिहिले आहे की ” पत्रकार महोदय तुमच्या माहितीसाठी.” उल्लेखनीय आहे की, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मो. आमिरने सलग अनेक ट्विट केले. या सर्व ट्विटला हरभजन सिंगने उत्तर दिले. त्यानंतर जेव्हा भज्जीने मो. आमिर जेव्हा आमिरला स्पॉट फिक्सिंगबद्दल सांगण्यात आले तेव्हा तो स्तब्ध झाला आणि नंतर अशोभनीय ट्विट करू लागला.

( हे ही वाचा: ‘या’ पाच राशीचे लोक असतात सर्वात प्रामाणिक; कधीच कोणाला फसवत नाहीत )

काय आहे मो. आमिर आणि हरभजन सिंग वाद?

क्रिकेटला जेंटल मेन्स गेम म्हणतात. तसेच एखाद्या देशाचे राजकीय संबंध काहीही असोत, पण जेव्हा दोन्ही बाजूचे खेळाडू मैदानात येतात तेव्हा खिलाडूवृत्तीच्या भावनेने एकत्र खेळतात. पण पाकिस्तानच्या बाबतीत तसे नाही. मो. आमिरने लागोपाठ असे अनेक ट्विट केले, ज्यामुळे त्याची खिलाडूवृत्ती उघड्या पुस्तकांसारखी बाहेर आली. मो. आमिर आणि हरभजन सिंग यांच्यातील वाद पाहून लोक म्हणू लागले आहेत की हा खरोखर सज्जनांचा खेळ आहे का?

( हे ही वाचा: YouTube च्या मदतीने तिने घरीच केली स्वत:ची प्रसूती; एकाच घरात राहून पालकांनाही कळलं नाही )

मो. आमिर स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला होता

माजी क्रिकेटपटू मो. आमिरने स्वतःच्याच देशाचा विश्वासघात केला होता. २०१० मध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर मो. आमिरने स्पॉट फिक्सिंग केले. २६ ते २९ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा डाव आणि २२५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. स्टुअर्ट ब्रॉडला सामनावीर तर पाकिस्तानी गोलंदाज मो. अमीरला मालिकावीर घोषित करण्यात आले. मो. आमिरने मुद्दाम नो बॉल टाकला. ज्यासाठी मो. अमीर सहा महिने इंग्लंडमध्ये तुरुंगात होता. याशिवाय त्याच्यावर पाच वर्षांची क्रिकेट खेळण्याची बंदी घालण्यात आली होती आणि त्याच सामन्यात त्याने स्पॉट फिक्सिंग केले होते. त्यामुळे २०११ मध्ये त्याला इंग्लंडमध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते. यानंतर मो. आमिरने जाहीर माफी मागितली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Harbhajan confronted the journalist who was making fun of team india on twitter and said ttg

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी