उद्योगपती हर्ष गोयंका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांचे लाखो चाहते आहे ज्यांच्याबरोबर ते नेहमी रंजक गोष्टी शेअर करत असतता. दरम्यान गोएंका यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची विमान प्रवासाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी करदात्यांच्या खर्चावर महागड्या खाजगी जेट घेण्याऐवजी कमी किमतीच्या एअरलाइनवर विमान प्रवास करण्यास पसंती दिली आहे. पंतप्रधान वोंग यांचा व्हिडीओ शेअर करत हर्ष गोएंका यांनी गोएंका यांनी त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

सिंगापूरचे पंतप्रधान वोंग स्कूट विमानात प्रवेश केल्यानंतर प्रवाशांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि त्याचा जयजयकार केला. तसेच इकॉनॉमी क्लासमधून उड्डाण केले. “सिंगापूरचे पंतप्रधान कमी किमतीच्या एअरलाईनच्या सामान्य नियोजित फ्लाइटने अधिकृत ड्युटीसाठी प्रवास करतात.करदात्यांच्या खर्चावर कोणतेही फ्रिल्स, कोणतेही राष्ट्रीय किंवा खाजगी जेट आणि मोठ्या ताफ्याशिवाय प्रवास करत आहे. अशा प्रकारे आदर मिळवला जातो,” असे गोएंका यांनी Xवर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

लाओसहून सिंगापूरला जाणाऱ्या स्कूट फ्लाइटमध्ये सीएनए पत्रकाराने हा व्हिडिओ शूट केला होता. त्यात हसतमुख वोंग स्कूट फ्लाइटमध्ये चढताना दिसत आहे आणि पुढच्या रांगेत बसल्यावर प्रवाशांनी जल्लोष केला आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. रिपोर्ट्सनुसार, त्याने एक्स्ट्रा लेग्रूमसह इकॉनॉमी फ्लाईटने प्रवास केला.

हर्ष गोएंका सह अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांना त्यांनी प्रभावित केले. काहींनी सांगितले की सिंगापूरचे पंतप्रधान “नम्र”, “डाउन टू अर्थ” आणि कमी किमतीच्या वाहनाचा वापर करण्याचे”अविश्वसनीय उदाहरण” होते. एका वापरकर्त्याने कमेंट केली की,”या घटनेने सामान्य लोकांशी जोडण्याची इच्छा दर्शविली.”

हेही वाचा –“बघ, कसं गूरू गूरू गूरू फिरतंय…”; वॉशिंग मशिन पाहून आजी काय म्हणाली? पाहा, आजीबाईंचा Viral Video

येथे Video Viral

https://x.com/hvgoenka/status/1845837729692865016

स्कूट फ्लाइटमधील प्रवाशांचा कॅमेऱ्यात फिरतानाचा व्हिडिओ शेअर करण्यासाठी वोंग नंतर फेसबुकवर गेला. “लाओसहून परतलो. विमानात चढल्यावर घरी आल्यासारखं वाटलं! हार्दिक स्वागतासाठी सर्वांचे आभार,” त्याने व्हिडिओला कॅप्शन दिले.

५१ वर्षीय लाओस येथे आयोजित ४४ व्या आणि४५व्या आसियान शिखर परिषद आणि संबंधित शिखर परिषदेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री व्हिव्हियन बालकृष्णनही होते.

हेही वाचा –“बाई, काय हा प्रकार! बुक्कीत टेंगूळ!”, बोबड्या बोलीत चिमुकलीने म्हटला निक्की अन् सुरजचा डायलॉग; पाहा Viral Video

वोंग यांनी शेअर केला हृदयस्पर्शी क्षण

येथे पाहा Video

https://www.facebook.com/LawrenceWongST/videos/892827242454017

लाओसहून परत आल्यानंतर, वोंगने एक हृदयस्पर्शी व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्याच्या स्कूट फ्लाइटमधील प्रवासी कॅमेऱ्याकडे पाहून हात दाखवत आहेत.

” लाऊसमधून परत आलो. विमानात चढताच मला घरी आल्यासारखं वाटलं आहे. सर्वांना धन्यावाद” असे कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिले.

५१ वर्षीय पंतप्रधान वोंग हे लाओस येथे आयोजित ४४ व्या आणि ४५ व्या आसियान शिखर परिषद आणि संबंधित शिखर परिषदेत सहभागी झाले होते. त्यांच्यासह सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री व्हिव्हियन बालकृष्णनही होते.