scorecardresearch

Viral Video : मुलासाठी आईचा भन्नाट जुगाड; हर्ष गोएंकांनी व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिलेने तिच्या मुलासाठी सायकलवर मागे बसण्यासाठी जुगाड करून सीट बनवल्याचे दिसत आहे. ही भन्नाट कल्पना नेटकऱ्यांना भावली आहे.

Viral Video : मुलासाठी आईचा भन्नाट जुगाड; हर्ष गोएंकांनी व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक
Photo : Social Media

Viral Video : आईसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आपल्या मुलाला कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक आई सतत प्रयत्न करत असते. कधीकधी शक्य नसतानाही काहीतरी शक्कल लढवून आई आपल्या मुलांच्या आनंदासाठी नवे मार्ग शोधून काढते. अशाच एका भन्नाट कल्पनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या मुलाला सायकलवरून घेऊन जाताना दिसत आहे. पण यामध्ये तिच्या मुलाला आरामात बसता यावे यासाठी तिने एक युक्ती केलेली दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओतील महिलेने मुलासाठी सायकलवर मागे बसण्यासाठी सीट बनवली आहे. प्लास्टिकची खुर्ची सायकलवर बसवून सीट बनवण्याचा हा जुगाड नेटकऱ्यांना भावला आहे. या महिलेने मुलाच्या सुरक्षेची पुर्ण काळजी घेतलेली दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ शेअर करत हर्ष गोएंका यांनी या महिलेचे कौतुक केले आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १४ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जणांनी या व्हिडीओवर ‘आईसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही’ ‘या आईने मुलासाठी सिंहासन तयार केले आहे,’ अशा कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा : फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला लॅपटॉप पण आले भलतेच काही; तक्रार नोंदवण्यासाठी शेअर केलेले फोटो झाले व्हायरल

हर्ष गोएंका यांनी शेअर केलेला व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

Viral Video : आरपीएफ अधिकाऱ्यांचे प्रवाशाला वाचवण्यासाठीचे थक्क करणारे प्रयत्न कॅमेऱ्यात कैद

आणखी वाचा : हत्तीच्या पिल्लाला कधी बॉलबरोबर खेळताना पाहिलंय? चेहऱ्यावर हास्य आणणारा Viral Video एकदा पाहाच

हा जुगाड नेटकऱ्यांना भावला असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या