बेडमध्येच बनवला कामाचा सेटअप! भन्नाट कल्पनेचा Video शेअर करत हर्ष गोएंकांनी केलं कौतुक | Harsh goenka shares innovative idea of work from home setup inside bed video goes viral | Loksatta

बेडमध्येच बनवला कामाचा सेटअप! भन्नाट कल्पनेचा Video शेअर करत हर्ष गोएंकांनी केलं कौतुक

हर्ष गोएंका यांनी ‘वर्क फ्रॉम होम’साठी बनवण्यात आलेल्या एका सेटअपचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा पाहाच.

बेडमध्येच बनवला कामाचा सेटअप! भन्नाट कल्पनेचा Video शेअर करत हर्ष गोएंकांनी केलं कौतुक
(Photo : Social Media)

‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना करोनाकाळात जास्त वापरण्यात आली. लॉकडाउन असल्याने कोणालाच घराबाहेर पडणे शक्य नव्हते, त्यामुळे सर्वांच्या कामाचे स्वरूप बदलले. सर्वांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याचा पर्याय देण्यात आला. आता सर्व निर्बंध काढून टाकल्यानंतर पुन्हा ऑफिसमधून कामाला सुरूवात झाली आहे. पण अजुनही बऱ्याच कंपन्यांकडुन ‘वर्क फ्रॉम होम’ हा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे अनेकजण घरूनच काम करतात, पण यामधली मुख्य अडचण म्हणजे ऑफिसमध्ये असणारा सेटअप घरी उपलब्ध नसतो. त्यासाठी नवा सेटअप विकत घेतला तर घरात जागेची अडचण होण्याची शक्यता असते.

‘वर्क फ्रॉम होम’साठी गरजेचा असणारा कामाचा सेटअप आणि जागेची अडचण या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ नक्की मदत करू शकतो. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने बेडमध्येच कामाचा सेट अप बनवला असल्याचे दिसत आहे. या भन्नाट कल्पनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कल्पनेचे कौतुक करत उदयोगपती हर्ष गोएंका यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ९० हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत. पाहूया ‘वर्क फ्रॉम होम’ साठी तयार करण्यात आलेला हा सेटअप.

Viral Video : मुलासाठी आईचा भन्नाट जुगाड; हर्ष गोएंकांनी व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

हर्ष गोएंका यांनी शेअर केलेला व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

आणखी वाचा : फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला लॅपटॉप पण आले भलतेच काही; तक्रार नोंदवण्यासाठी शेअर केलेले फोटो झाले व्हायरल

बेडमध्येच बनवलेला हा कामाचा सेटअप नेटकऱ्यांना आवडला असून, हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लहाणपणीचे ‘करण-अर्जुन’! विराट कोहली आणि बाबर आझमच्या सेम टू सेम दिसणाऱ्या फोटोवर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
Video: नग्नावस्थेत तब्बल २५०० लोकं पोहोचली एकाच ठिकाणी…कारण ऐकाल तर..
Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…
Viral Video: मगर आली आणि चिमुकल्याला घेऊन गेली, हतबल वडिलांनी डोळ्यादेखत पाहिला मुलाचा दुर्दैवी अंत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
जपानविरुद्धच्या सामन्यात क्रोएशियाचे पारडे जड
विश्लेषण: नीति आयोग: त्यांचा आणि आपला..
ऑस्ट्रेलियाला नमवत अर्जेटिना उपांत्यपूर्व फेरीत
ब्राझीलसमोर दक्षिण कोरियाचे आव्हान
भारत-बांगलादेश एकदिवसीय मालिका: बांगलादेशचा भारतावर रोमहर्षक विजय