scorecardresearch

देसी जुगाड! उंच झाडावर आरामात चढण्यासाठी बनवली स्कूटर; video पाहून म्हणाल…

viral video : भारतीयांच्या जुगाडाची बरोबरी कोणीही करु शकत नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

‘tree-climbing scooter’
देसी जुगाड ( सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आपल्याला तर हे माहित आहे की, जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांचा हात कोणीही धरु शकत नाही. आपल्याकडे लोकांना प्रत्येक गोष्टीत जुगाड करण्याची सवय आहे. त्यामुळे दररोजच्या वस्तुंपासून ते अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी जुगाड करतात. भारतीयांच्या जुगाडाची बरोबरी कोणीही करु शकत नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असणार जे तुम्हाला आश्चर्यचकीत करतात. उद्योगपती हर्ष गोयंका नेहमीच हटते व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

३० सेकंदात ८४ मीटर उंच झाडावर –

ग्रामीण भागात सुपारी, नारळ आणि खजूर यासारख्या झाडांवरील फळे वेळेवर तोडणे आवश्यक असते.यासोबतच फळे आणि पानांची छाटणी करण्यासाठी किंवा कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी झाडांवर चढावे लागते. मात्र नारळासारख्या ऊंच झाडावर चढण्याची कला फक्त काही लोकांनाच अवगत असते, आणि असे लोक या कामासाठी जास्त रक्कम आकारतात. पण व्हिडीओमधील या अनोख्या मशिनच्यासाह्याने तुम्ही सहज झाडावर चढू शकता. गोएंका यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस झाडाला जोडलेल्या एका स्कूटरवर बसतो आणि सहज वर जातो. तामिळनाडूतील 50 वर्षीय शेतकरी गणपती भट यांनी उंच झाडांवर चढण्यासाठी ट्री क्लाइंबिंग स्कूटर बनवली आहे. ही ट्री क्लाइंबिंग स्कूटर ३० सेकंदात ८४ मीटर उंच झाडावर पोहोचू शकते. उंच झाडावर चढून फळे तोडण्यासाठी किंवा इतर कामासाठी याचा वापर सहज करता येतो..

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – video: मुसळधार पाऊस, चिखलात रुतलेल्या हत्तीची मृत्युशी झुंज आणि अखेर…

उंच झाडावर चढणे हे जोखमीचे काम असून झाडाचा पृष्ठभाग सपाट नसल्यामुळे अनेक वेळा पाय घसरण्याचा धोका असतो. स्कूटर फळे काढणीपासून ते कीटकनाशक फवारणीपर्यंत अनेक प्रकारच्या कामात शेतकऱ्यांना मदत करू शकते. या अनोख्या जुगाडाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 11:47 IST

संबंधित बातम्या