MBBS डॉक्टरने शेण खाल्लं…म्हणतो यात व्हिटॅमिन असतं! पाहा हा VIRAL VIDEO

गायीचं दूध पिणं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अनेकजण गोमुत्र देखील पिताना तुम्ही पाहिलं असेल. पण गायचं शेण खाणाऱ्या या डॉक्टरच्या व्हिडीओची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरूय.

haryana-doctor-manoj-mittal-eats-cow-dung
(Photo: Twitter/ @DrMANOJMittal2)

गायीचं दूध पिणं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आजही कित्येक घरांमध्ये आई-वडील आपल्या मुलांच्या नाश्तामध्ये एक ग्लास दुधाचा सक्तीनं समावेश करतात. पण गायीचं गोमुत्र सुद्धा अनेकजण पिताना तुम्ही पाहिलं असेल. पण, गायीच शेण सुद्धा आरोग्यसाठी चांगलं असतं असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर…? हे ऐकून तुम्हाला किळस येईल. पण याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका MBBS डॉक्टरने शेण खाल्लंय. गायीच्या शेणाने माणसाचं मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो, असा दावा या डॉक्टरने VIRAL VIDEO मध्ये केलाय. पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. त्यानंतर गायीचं शेण खाणाऱ्या डॉक्टर बराच चर्चेत आलाय. या व्हायरल व्हिडीओमधल्या डॉक्टरचं नाव मनोज मित्तल असून तो हरियाणातल्या कर्नालमध्ये राहणारा आहे. तो एमबीबीएस डॉक्टर असून त्याचं मोठं हॉस्पिटल सुद्धा आहे. तो एक बालरोग तज्ज्ञ असून गायीचं शेण आणि गोमुत्राचे सेवन केल्यानं कोणताच आजार होत नाही, असा त्याने दावा केलाय. या व्हिडीओमध्ये तो स्वतः कॅमेऱ्यासमोर सर्वांना गायीचं शेण खाताना दाखवत आहेत. त्यानंतर तो याचे होणारे फायदे लोकांना सांगताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही विचार करत असाल की, या डॉक्टरने केवळ कॅमेऱ्यासमोर दाखवण्यासाठी तर गायचं शेण खाल्लं नसेल ना…तर हा एमबीबीएस डॉक्टर आता आता नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासून शेण खातोय. शेणामध्ये व्हिटॅमिन बी १२ असतं असं या डॉक्टरचं म्हणणं आहे. शेणामुळे माणसाचा रेडिएशनपासून बचाव होतो, असं देखील या डॉक्टरांनी म्हटलंय.

गायीच्या शेणात 28 टक्के ऑक्सिजन असतो. त्यामुळे शेणाच्या सेवनानं शरीरात थंडावा निर्माण होतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, डॉक्टर मित्तल यांनी आजपर्यंत कधीच एसी किंवा पंख्याचा वापर केला नाही. तर आतापर्यंत ते फक्त फरशीवर झोपतात. आपल्या आजुबाजुला असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. या रे़डिएशनपासून गायीचं शेण माणसाच्या शरीराचा बचाव करतो, असं देखील डॉक्टर या व्हिडीओमध्ये सांगतोय.

आम्हाला भाऊ-बहिण आहेत आणि प्रत्येक जण नैसर्गिक प्रसुतीने जन्स झालाय. कुणालाच ऑपरेशनची करण्याची वेळ आली नाही. कारण त्याच्या आई गायीचं शेण खात होत्या, असं कॅप्शनमध्ये लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. भारताकडे ‘गायीचं शेण’ ही सगळ्यात शक्तीशाली गोष्ट आहे. असं देखील या कॅप्शनमध्ये म्हटलंय. Shahnawaz Ansari या सोशल मीडिया युजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर शेण खाणाऱ्या या डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय.

आणखी वाचा : हे काय? माणसाचा पुतळा अचानक उठू लागला… हा खतरनाक VIRAL VIDEO पाहून तुम्हीही घाबराल

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कत्तलखान्यात जाण्याच्या भीतीनं गायीनं धूम ठोकली आणि थेट वॉटरपार्कमध्ये स्लाइड्सवर खेळू लागली…

सोशल मीडियावर या डॉक्टरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी आपआपली मतं शेअर करण्यास सुरूवात केलीय. त्यांनी केलेल्या दाव्यावरून डॉक्टर मित्तल यांच्या पदवीबाबत शंका निर्माण करण्यात येत आहे. काही युजर्सनी डॉक्टरच्या दाव्याला पाठिंबा दिलाय. तर काही युजर्सनी वाद-विवादाला सुरूवात केलीय. गायीचं शेण खाल्ल्यानं खरंच शरीराला फायदा होतो का, असा प्रश्न विचारताना दिसून येत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला ३५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Haryana doctor manoj mittal eats cow dung urine says it purifies body mind and soul watch prp