सोशल मीडियावर दररोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला १०० वर्षे जुनं अंडं खाताना दिसत आहे. होय, या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की ही एशियन डेलीकेसी आहे ज्याला १०० वर्षे जुनं अंडं म्हणतात. हे सामान्य अंड्यापेक्षा खूप वेगळे दिसते आणि त्याची चव कशी असते, हे या महिलेने तपासले आणि सांगितले.

१०० वर्ष जुने अंडं म्हणजे काय ?

१०० वर्षे जुनं असलेलं हे अंडं चाइनीज प्रिजर्व्ड अंड असतं. यामध्ये हिरवी आणि मलईदार अंड्यातील पिवळ बलक आणि पारदर्शक, जिलेटिनस पांढरा भाग आहे. यात तपकिरी-पिवळा ते अंबर रंग आहे, परंतु बाह्य पृष्ठभागावर एक घन काळा रंग दिसतो. ही अंडी बनवण्याची एकच पद्धत नाही.एका प्रक्रियांमध्ये पाणी, मीठ, राख आणि चुना यापासून बनवलेल्या पेस्टमध्ये अंड्यांचा लेप करून त्यावर तांदळाच्या कोंडा किंवा काही सामग्रीने झाकणे आणि साठवणे यांचा समावेश होतो. अंडी काही काळ मातीच्या भांड्यात ठेवली जातात किंवा जमिनीत गाडली जातात. ४५ दिवसांपासून ते १०० दिवसांपर्यंत जतन केले जातात.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
9 year old deadlifting 75 kg viral video
भारतातील सर्वांत शक्तिशाली चिमुरडी! पाहा नऊ वर्षीय ‘धाकड’ मुलीचे शक्तिप्रदर्शन; Video पाहून व्हाल थक्क…
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी
Video Of Baby Turtles Making Their First Voyage Will Give You Goosebumps
Video : डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहे ही कासवांची प्रजाती, चिमुकल्या कासवांचा पहिला समुद्र प्रवास एकदा बघाच

(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)

व्हायरल व्हिडीओ

नुकताच आशी नावाच्या ब्लॉगरने याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या आशियाई डिशची चाचणी घेण्यात आली, ज्याला १०० वर्षे जुनं अंडं म्हटले जात आहे. १०० वर्षे जुनी अंडी आतून पांढऱ्या ऐवजी पूर्णपणे तपकिरी आणि काळ्या रंगाची झाली असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अंडी खाऊन ही महिला सांगते की अंड्याचा पांढरा रंग गडद तपकिरी आणि जिलेटिनस असतो तर अंड्यातील पिवळ बलक गडद हिरवा आणि मलईदार असतो. तथापि, अंड्याचे कवच पांढरेचं असते.

(हे ही वाचा: वर्गात मुलांनी शिक्षिकेसमोर दाखवलं आपलं अनोखं टॅलेंट; हा Viral Video एकदा बघाचं)

(हे ही वाचा: Video: आता लग्नसोहळ्यावरही ‘पुष्पा’ची क्रेझ! नवरदेव म्हणतो ‘मैं झुकेगा नहीं…’)

काय म्हणाले नेटीझन्स?

या महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे. नेटीझन्सना १०० वर्षे जुनं अंडं पाहून आश्चर्य वाटते. काहीजण त्याच्या चवीबद्दल प्रश्न विचारत आहेत, तर काही विचारत आहेत की त्याचा सुगंध कसा आहे?

(हे ही वाचा: स्वप्नात ‘या’ ५ गोष्टी दिसणे देतात धन प्राप्तीचे संकेत!)

जरी १०० वर्षे जुनं अंडं खाणे हे आपल्यासाठी एक अनोखे दृश्य असू शकते. परंतु लाओ, थाई आणि इतर समुदायातील लोकांसाठी हे एक सामान्य दृश्य आहे आणि त्यांनी १०० वर्षे जुन्या अंड्याबद्दल अनभिज्ञ लोकांना पटवून देण्यासाठी अनेक टिप्पण्या केल्या. एका वापरकर्त्याने लिहिले की “फक्त ज्यांना आश्चर्य वाटते त्यांच्यासाठी, १०० वर्षे जुनी अंडी खरोखर शतके घेत नाहीत आणि खरोखर शंभर वर्षे जुनी नाहीतचं. त्यांना जतन करण्याच्या प्रक्रियेस फक्त महिने लागतात. बदकांची अंडी सहसा यासाठी वापरली जातात … परंतु त्यांची चव १०० पट चांगली असते.”