मध्य प्रदेशमधील वन्य प्राण्यांचे अनोखे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असतात.असाच छिंदवाडा येथील पेंच नॅशनल पार्कचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ तिथे उपस्थितीत पर्यटकांनी शूट केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका हरणाने उंच उडी मारली आहे. तेथे उपस्थित पर्यटकांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. या काळात मध्यप्रदेशात हरणाची एवढी उंच उडी क्वचितच कोणी पाहिली असेल. ही उडी बघून सगळेचं हरीण उडत आहे असचं म्हणत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या पेंच नॅशनल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरायला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान त्यांच्या समोरून हरणांचा कळप जात होता. पर्यटकांना पाहताच हरीण इकडे तिकडे धावू लागले. यावेळी हे हरिण तेथे एकटे पडले होते. पर्यटकांना पाहताच तो घाबरला आणि त्याने उंच उडी मारली. लोक आधीच एकट्या पडलेल्या हरणाचे व्हिडीओ बनवत होते. तेव्हाच या हरणाचा लांब उडी मारतानाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

(हे ही वाचा: भारतातलं स्वित्झर्लंड बघितलं का? बर्फाच्छादित रुळावरून धावणाऱ्या ट्रेनचा मंत्रमुग्ध करणारा Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

(हे ही वाचा: रेल्वे रुळावर बाईक चालवत होता तरुण, समोरून आली ट्रेन आणि…; बघा Viral Video)

पर्यटकांची रेलचेल

वास्तविक, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही पर्यटक मध्य प्रदेशातील राष्ट्रीय उद्यानांमध्ये पोहोचत आहेत. पेंच नॅशनल पार्कला नवीन वर्षाच्या निमित्ताने सुट्टीच्या दिवशीही मोठ्या संख्येने लोक भेट देतात. यादरम्यान त्यांना वन्य प्राण्यांची अनेक रूपे पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have you ever seen a flying deer national park video viral ttg
First published on: 17-01-2022 at 10:26 IST