करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन देशभरात लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. अशा परिस्थितीत झारखंडमधून करोना लसीशी संबंधित एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे अर्धांगवायूच्या रुग्णाला करोनाची लस देण्यात आली होती. लस देताच दुसऱ्याच दिवशी तो उठला आणि चालायला लागला. ४ वर्षांपासून बेडवर पडलेला अर्धांगवायूचा रुग्ण अचानक कसा बरा झाला हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४ वर्ष होता बेडवर पडून

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण झारखंडमधील बोकारो येथील सालगदीह गावातील आहे. या गावातील ५५ वर्षीय दुलारचंद मुंडा यांना गेली चार वर्षे अंथरुणातून उठताही येत नव्हते. पण आता असा दावा केला जात आहे की करोना लसीच्या एका डोसने ते पूर्णपणे बरे झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांना करोनाच्या कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.

(हे ही वाचा:Viral Video: लग्नात नवरदेव करत होता डान्स तेव्हाच, नवरीने काढली चप्पल आणि…)

लसीमुळे आनंद

दुलारचंद म्हणाले की, ‘ही लस घेऊन मला खूप आनंद झाला आहे. ४ जानेवारीला लस घेतल्यानंतर माझ्या पायाला गती आली आहे.’ त्याच्याबद्दल अशी माहिती आहे की, रस्ता अपघातानंतर त्याला चालताही येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. ही चमत्कारिक घटना पाहिल्यानंतर बोकारोचे डॉक्टरही त्याचा वैद्यकीय इतिहास पाहिल्यानंतर शास्त्रज्ञांना यावर संशोधन करावे लागेल, असे सांगत आहेत.

(हे ही वाचा: Photos: पार्ले-जी मधील ‘जी’ चा नेमका अर्थ तुम्हाला माहीत आहे का?)

(हे ही वाचा: दोन शिकारी एक शिकार! कोण जिंकलं या लढाईत? पहा Viral व्हिडीओमध्ये)

डॉक्टरही आश्चर्यचकित झाले

बोकारोच्या सिव्हिल सर्जननेही या मुद्द्यावर तीन सदस्यीय वैद्यकीय पथक तयार केले आहे, जे या घटनेची चौकशी करेल. सिव्हिल सर्जन डॉ जितेंद्र कुमार यांनी मुंडा यांच्यासोबत झालेल्या चमत्काराबाबत म्हटले आहे की, ‘हे पाहून मी थक्क झालो आहे…. शास्त्रज्ञांना याचा शोध घ्यावा लागेल. काही दिवस आजार बरा झाला असता, तर समजू शकले असते, पण ४ वर्षांचा आजार लस दिल्यानंतर अचानक बरा झाला तर विश्वास बसत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He had been paralyzed for 4 years he started walking as soon as he vaccinated ttg
First published on: 16-01-2022 at 11:04 IST