आजकाल, फूड ब्लॉगर्स सोशल मीडियावर अनेक अनोख्या प्रकारचे खाद्यपदार्थ समोर आणताना दिसत आहेत. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे. अलीकडे रस्त्यावरील एक खाद्यपदार्थ विक्रेता तेल न घालता ऑम्लेट बनवताना दिसला. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हा विक्रेता ऑम्लेट बनवण्यासाठी तेलाऐवजी पाण्याचा वापर करत आहे.

सध्या लोक आपल्या आरोग्याच्या बाबतीत अधिक सतर्क होत आहेत. यामुळेच लोकं आपली लाइफस्टाइल आणि आहारात तेलाचा वापर न करता बनवलेल्या पदार्थांना प्राधान्य देत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिल्लीत एक स्ट्रीट फूड विक्रेता पाण्यात ऑम्लेट बनवताना दिसत आहे. जे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Viral Video: पोलीस दिसताच दंड टाळण्यासाठी तरुणीने वाढवला स्कुटीचा वेग; त्यानंतर जे झालं ते पाहून हैराण व्हाल

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये स्ट्रीट फूड विक्रेता दोन अंड्याचे ऑम्लेट बनवण्यासाठी त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, मीठ आणि मसाले घालताना दिसतो. त्यानंतर पॅनमध्ये पाणी टाकून ऑम्लेट बनवतो. ऑम्लेट अधिक चविष्ट बनवण्यासाठी तो त्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर टाकतो. यानंतर तो हळू-हळू ऑम्लेट पलटतो.

शेवटी, स्ट्रीट फूड विक्रेता प्लेटमध्ये हे ऑम्लेट सर्व्ह करताना कोथिंबीर आणि चटणी ओतताना दिसतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला आतापर्यंत १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झालेले नेटकरी व्हिडीओवर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.