scorecardresearch

Premium

तुमच्या दैनंदिन जीवनात करा ‘हे’ बदल! Video शेअर करत आयएएस अधिकारी यांनी दिली माहिती…

आयएएस अधिकारी यांनी कोणत्या गोष्टींच्या मदतीने आपले जीवन अधिक सोपे आणि आनंदी होईल याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत.

Health Tips These Daily Life Changes Can Make Your Life Happy and Mind Pease
(सौजन्य:ट्विटर/@suhas_ly) तुमच्या दैनंदिन जीवनात करा 'हे' बदल! Video शेअर करत आयएएस अधिकारी यांनी दिली माहिती…

आजकाल प्रत्येकाचे जीवन खूप व्यस्त झाले आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यस्त आहेत. काम आणि जवाबदारी या दोन्ही गोष्टींमुळे तणाव प्रत्येकाचा जीवनात अगदीच सामान्य झाला आहे. तसेच या सगळ्यामुळे नकळत आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. पण, प्रत्येकाने दिवसाच्या वेळापत्रकातून थोडा वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे. तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आयएएस अधिकारी यांनी कोणत्या गोष्टींच्या मदतीने आपले जीवन अधिक सोपे आणि आनंदी होईल याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत.

आयएएस अधिकारी सुहास (IAS Suhas LY) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत ; ज्याच्या मदतीने आपले जीवन अधिक सोपे आणि आनंदी होऊ शकते. काय आहेत या खास टिप्स पाहू…
१. सगळ्यात पहिला त्यांनी व्हिडीओत सांगितले की, दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी एक तास तुम्हाला व्यायाम करण्याची गरज आहे.
२. दुसरं म्हणजे साकारात्म विचार. आपण प्रत्येक गोष्टींचा चांगल्या बाजूने विचार केला पाहिजे.
३. प्रत्येकाने तेल, साखरेचं सेवन थोडं कमी केलं पाहिजे.
४. मोबाईलचा वापर कमी करा आदी काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी व्हिडीओ द्वारे सांगितल्या आहेत.

Car Insurance
Car Insurance: कार इन्शुरन्सबद्दल ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात; तुम्हाला होईल फायदा!
tcs ceo kritiwassan
वर्क फ्रॉम होम फायद्याचं की तोट्याचं? टीसीएसच्या सीईओंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
Children Screen Time
मुलांना स्मार्ट बनवायचं आहे, पण त्यांचा स्क्रीन टाइम कसा कमी कराल? जाणून घ्या सोप्या टिप्स!
money mantra Audit Income Tax Act applicable
Money Mantra : प्राप्तिकर कायद्यातील लेखापरीक्षण कोणाला लागू आहे?

हेही वाचा…Video: ४६ वर्षीय ‘या’ भारतीय महिलेचे आहेत सर्वात लांब केस! गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद…

पोस्ट नक्की बघा :

तसेच तुम्हाला या सगळ्यांमध्ये कोणत्या गोष्टी योग्य वाटत आहेत त्यांचा तुमच्या जीवनात नक्की उपयोग करून बघा असे देखील आयएएस अधिकारी यांनी आवर्जून सांगितले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @suhas_ly यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आयएएस अधिकारी सुहास एलव्हाय एक भारतीय बॅडमिंटनपटू आणि आयएएस अधिकारी आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health tips these daily life changes can make your life happy and mind pease asp

First published on: 30-11-2023 at 22:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×